चांगला सिनेमा पहा, सामाजिक जाणीवा जोपासा : कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:42 IST2020-02-12T13:31:54+5:302020-02-12T13:42:29+5:30
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

कागदाचे विमान उडवून शाहू स्मारक भवन येथे आयोजित चिल्लर पार्टीच्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेता आनंद काळे यांनी केले. यावेळी अभय बकरे, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, रविंद्र शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी चांगले सिनेमे पाहिले पाहिजेत, धाडस, चांगली वृत्ती आणि सामाजिक जाणीवा जोपासल्या पाहिजेत. चिल्लर पार्टीच्या या उपक्रमातून सामाजिक जाणीवा निर्माण होतील, अशी अपेक्षा कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली.
येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कलशेट्टी बोलत होते. दोन दिवसाच्या बालचित्रपट महोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता आनंद काळे आणि शिक्षण समितीचे सदस्य नगरसेवक रत्नेश शिरोळकर उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी महोत्सवासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत कागदी विमान उडवून या महोत्सवाचे अनोख्या पध्दतीने उदघाटन केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.
आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले, की कचरा न करता केलेल्या या पर्यावरणपूरक समारंभाबद्दल चिल्लर पार्टीच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. कोल्हापूर शहर स्वच्छ आणि प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी विध्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिनेता आनंद काळे यांनी जगभरातील उत्तम सिनेमे पाहण्याची संधी या महोत्सवात मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि चिल्लर पार्टीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी रविंद्र शिंदे यांनी प्रास्तविक केले. यावेळी अरशद महालकरी, अनुजा बकरे आणि नसीम यादव या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या बाललेखकांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी यावेळी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, निहाल शिपुरकर, शैलेश चव्हाण, श्रीधर कुलकर्णी, अनिल कोकणे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आभार अभय बकरे यांनी मानले. यावेळी करवीरचे गट शिक्षनाधिकरी विश्वास सुतार, मिलिंद नाईक, सुधाकर सावंत, मिलिंद कोपार्डेकर, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, अनिल काजवे,गुलाबराव देशमुख, चंद्रशेखर तुदिगाल, ओंकार कांबळे आदी उपस्थित होते.
- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
- महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या ३० शाळांतील सुमारे १६०० विद्यार्थी सहभागी झाले. दिवसभरात बेब, फ्री विली आणि पीटस ड्रॅगन हे सिनेमे दाखविण्यात आले.
- महोत्सवात आज
या महोत्सवात डम्बो आणि २ वाजता डॉग्ज वे होम हे सिनेमे हे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. दुपारी महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव उपस्थित आहेत.
शाहू स्मारक भवनाच्या आवारातील विमान लक्षवेधी
या महोत्सवाचा लोगो असलेल्या विमानाची प्रतिकृती शाहू स्मारक भवनाच्या प्रवेशद्वारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय महानगरपालिकेतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी विमानांच्या कलाकृतींचे प्रदर्शन प्रांगणात भरविण्यात आले आहे.