शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 4:06 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवली. कामगारांचा तळतळाट घ्याल तर पुन्हा सत्तेत येउ देणार नाही, असा इशाराही दिला.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाअंगणवाडी, आशा, मोलकरीण, बांधकामासह कामगार सहभागी

कोल्हापूर: जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवली. कामगारांचा तळतळाट घ्याल तर पुन्हा सत्तेत येउ देणार नाही, असा इशाराही दिला.केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटना दोन दिवसीय संपावर आहेत. मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेधाची सुरुवात करण्यात आली, बुधवारी त्यापेक्षा अधिक ताकदीने मोर्चा काढून संपाची सांगता करण्यात आली.

सेंटर आॅफ ट्रेड युनियन जिल्हा कमिटी सिटू, कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर व गटप्रर्वतक युनियन, लाल बावटा, आयटक संघटनेच्या वतीने निघालेल्या या विराट मोर्चात अंगणवाडी, आशा, मोलकरीण, बांधकाम आदि विभागातील सर्व असंघटीत कामगार सहभागी झाले. महिलांची संख्या लक्षणीय होती.दसरा चौकातून दुपारी एकच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. हातात सिटू व लाल बावट्याचे निशाण आणि घोषणांचे फलक घेउन निघालेला हा मोर्चा व्हीनसकॉर्नर, स्टेशनरोड, असेंब्लीरोड मार्गे दुपारी पावनेदोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर येउन धडकला. मोदी चले जाव, केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे तर काय खाली डोके वर पाय अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.रस्त्यावरच ठिय्या मारत तेथूनच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. येथेच मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. दिलीप पोवार, अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, नेत्रदीपा पाटील, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम या सर्वांनी मनोगत व्यक्त करताना कामगारविरोधी सरकारवर टिकेची झोड उठवली.वाहतूकीची कोंडीसीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर ते असेंब्ली रोड हा पूर्णपणे मोर्चेकऱ्यांनी व्यापल्याने सर्व वाहतूक लक्ष्मीपुरी कोंडा ओेळ व लुगडी ओळमार्गे वळवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण लक्ष्मीपुरीत वाहतूकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी सर्व वाहतूकही विस्कळीत झाली. स्टेशनरोडवर रेल्वेस्टेशनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सव्वादोननंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर