शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’ कार्यालयाला सील

By admin | Updated: July 21, 2015 01:02 IST

प्रशासनाची कारवाई : नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

कोल्हापूर : नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने सोमवारी सेतू कार्यालय सील केले. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असली तरी तात्पुरती सोय म्हणून शहरातील विविध भागांत असलेल्या महा ई-सेवा केंद्रांना दाखले देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना लागणारे रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल यासह अन्य दाखले देण्यासाठी सेतू केंद्र स्थापन करून २०१३ रोजी हे काम खासगी ठेकेदार असलेल्या बेळगांवच्या जेनिक कॉम्प्युटर कंपनीला दिले होते. पूर्वी हे सेतू केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होते, परंतु इमारत बांधकामाच्या निमित्ताने ते मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात हलविण्यात आले. तेथे गेल्यापासून या सेतू केंद्राबाबत अनेक तक्रारी होत होत्या. आवश्यक असणारी मशिनरी नसणे, पुरेसे मनुष्यबळ नसणे, स्टेशनरी उपलब्ध करून न देणे, दाखले देण्याकरिता जादा पैसे घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे आणि दाखले वेळेत न देणे यासारख्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे गेल्या होत्या. त्याची दखल करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी घेऊन त्यांचा ठेका रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली होती. तथापि, ठेकेदाराबरोबरचा करार रद्द करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. ती प्रक्रिया सध्या प्रशासन राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी हे सेतू केंद्र सील करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. सोमवारी अनेक नागरिक या कार्यालयात गेले तेव्हा त्यांना सेतू केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र, जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व महा ई-सेवा केंद्रांना त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना तातडीने दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पंधराशे दाखले प्रलंबित सेतू केंद्रातील कारभाराचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी गेल्या दोन महिन्यांत या कार्यालयाकडून प्राप्त अर्जांपैकी १५०० हून अधिक दाखले देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना केवळ हेलपाटे मारावे लागत आहेत. नोटीस व दंडात्मक कारवाई सेतू केंद्र चालविण्यास घेतलेल्या ठेकेदार जेनिक कॉम्प्युटर यांना तहसीलदार योगेश खरमाटे यांनी नोटीस दिली होती. त्यानंतर प्रांत प्रशांत पाटील यांनीही एक नोटीस दिली आहे तसेच दंडात्मक कारवाईही केली होती. तरीही कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळे सोमवारी सेतू केंद्र सील करावे लागले. (प्रतिनिधी)