शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोहताना दम लागला, काठावर येत उलट्या करून निपचित पडला; मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:05 IST

दिंडनेर्ली : येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पोहताना दम लागून मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय १३) असे त्याचे नाव आहे. ...

दिंडनेर्ली : येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पोहताना दम लागून मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय १३) असे त्याचे नाव आहे. काल, गुरुवारी ही घटना घडली.घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, आयुष हा नेहमीप्रमाणे वाण्याचे शेत परिसरात असलेल्या चुलत्याच्या विहिरीत मित्रांसोबत पोहायला गेला होता. पोहत असताना नाका तोंडात पाणी जाऊन त्याला दम लागला. तशा परिस्थितीतही काठावर येऊन उलट्या करून त्याच ठिकाणी निपचित पडला.सोबत असणाऱ्या मित्रांनी पोटातील पाणी काढून श्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याची हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच तत्काळ गाडीवरून त्याला गावात आणले. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आयुष हा गावातील ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या आयुषच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आयुषचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, चुलते, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwimmingपोहणेDeathमृत्यू