हुपरी : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. अथर्व शिवाजी हांडे (वय १७, राहणार होळकर नगर, हुपरी) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. हुपरी रेंदाळ रोडवरील मधल्या रस्त्याजवळ असलेल्या रणदिवे यांच्या शेतात सायंकाळी ही घटना घडली. सुनील सुरेश मुधाळे यांच्या तक्रारीवरून हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, रविवारी अथर्वच्या बहिणीचा विवाह झाला. घरात आनंदाचे वातावरणात असताना दुसऱ्या दिवशीच ही घटना घडली. अथर्व १२ वीत शिक्षण घेत होता. वडिलांना मदत करण्यासाठी तो चारा आणायला गेला होता, मात्र तो परत आला नाही.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Student dies from electric shock while helping his father.
Web Summary : A 17-year-old student in Kolhapur died after coming into contact with a live electric wire while fetching fodder for livestock. The tragic incident occurred a day after his sister's wedding, bringing sorrow to the family. He was helping his father.

Web Title : कोल्हापुर: पिता की मदद करते समय बिजली के झटके से छात्र की मौत
Web Summary : कोल्हापुर में एक 17 वर्षीय छात्र की पशुओं के लिए चारा लाते समय बिजली के तार से संपर्क होने से मौत हो गई। दुखद घटना उसकी बहन की शादी के एक दिन बाद हुई, जिससे परिवार में मातम छा गया। वह अपने पिता की मदद कर रहा था।