शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तातडीने बेळगावला रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:36 IST2022-12-29T16:31:32+5:302022-12-29T16:36:44+5:30

प्रकाश बेळगोजी बेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तातडीने बेळगावकडे ...

School Education Minister Deepak Kesarkar immediately left for Belgaum | शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तातडीने बेळगावला रवाना 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तातडीने बेळगावला रवाना 

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तातडीने बेळगावकडे रवाना झाले आहेत. केसरकर यांच्या सासूबाई उमा प्रभाकर कलघटगी यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते बेळगावला रवाना झाले.

हिंदू नगर टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती उमा प्रभाकर कलघटगी (वय ८६) यांचे आज, गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्री समादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर शं. कलघटगी यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सासू होत्या. तसेच लोंढा जि.पं.चे माजी सदस्य उमाकांत ल. कपिलेश्वरी यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा हिंदुनगर (दुसरे रेल्वेगेट) त्याच्या रहात्या बंगल्या पासून सायंकाळी ५ वाजता निघणार आहे. बेळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 

Web Title: School Education Minister Deepak Kesarkar immediately left for Belgaum