इचलकरंजीत बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:34 AM2019-08-01T11:34:57+5:302019-08-01T11:41:10+5:30

 इचलकरंजी येथील पंचगंगानदीत मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले. सुरेश कृष्णा भामटे (वय - ४२ , रा. विक्रमनगर इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Saved youth rescued in Ichalkaranji |  इचलकरंजीत बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले

 इचलकरंजीत बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले

Next
ठळक मुद्दे इचलकरंजीत बुडणाऱ्या तरुणाला वाचवलेरेस्क्यू फोर्सचे जवान, आपत्ती व्यवस्थापनाला यश

 इचलकरंजी : येथील पंचगंगानदीत मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले. सुरेश कृष्णा भामटे (वय - ४२ , रा. विक्रमनगर इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घरगुती कारणावरून पुराच्या पाण्यात त्याने उडी मारली. घरातील  सतत वाद व त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. त्याला वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आहे. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

गुरुवारी सकाळी इचलकरंजी पंचगंगा नदीवर गस्त घालत असताना मोठ्या पुलावरून एक व्यक्तीने नदीत उडी मारली. त्या ठिकाणी असणारे आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडेचे जवान संभाजी झुटाळ  यांच्या निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ तेथे असणारे इचलकरंजी नगरपालिकाचे आपत्ती विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब रेस्क्यू बोट सज्ज ठेवली होती, तात्काळ त्यांनी मामा व इतर जवान घेऊन शोध मोहीम सुरू केली.

ठराविक अंतरावर तो झाडाला अडकलेला दिसला, त्या ठिकाणी बोटीने जाऊन त्याला वाचविण्यास यश आले. सुरेशने घरातील त्रासाला कंटाळून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने उडी घेताच रेस्क्यू फोर्सचे अनिल पाटोळे, खोंद्रे, निखिल सनदी, यांनी पाठोपाठ नदीपात्रात उड्या मारल्या. दरम्यान, तो तरुण पुरातील एका झाडाला अडकून थांबला होता.

जवानांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने त्याला पाण्याबाहेर काढले, यावेळी उपस्थित अग्निशमन दलाचे जवान रामा जावळे, मुन्ना हैदर, सुभाष पोवार व संजय कांबळे आणि आधार रेस्क्यू फोर्सचे संभाजी झुटाळ यांनी त्याला पुढील उपचार व तपासासाठी पोलिसाच्या स्वाधिन केले. आधार रेस्क्यू फोर्स, टाकवडेचे जवान संभाजी झुटाळ, जमीर फनिबंद व इचलकरंजी नगरपालिका आपत्ती विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Saved youth rescued in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.