सत्यशोधक शाहीर दशरथ रेडेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:00 IST2020-10-17T17:59:19+5:302020-10-17T18:00:20+5:30
kolhapurnews, kolhapur , Satyashodhak सत्यशोधक चळवळीतील नामवंत शाहीर आणि मुंबईस्थित हेब्बाळ - जलदयाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दशरथ जोती रेडेकर(वय-७१) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,भाऊ असा परिवार आहे.

सत्यशोधक शाहीर दशरथ रेडेकर यांचे निधन
गडहिंग्लज : सत्यशोधक चळवळीतील नामवंत शाहीर आणि मुंबईस्थित हेब्बाळ - जलदयाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दशरथ जोती रेडेकर(वय-७१) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,भाऊ असा परिवार आहे.
गिरणी कामगारांचे नेते दिवंगत माजी आमदार दादू अत्याळकर यांच्या समवेत विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. टपाल खात्यातून ते निवृत्त झाले होते.
कोटयवधी रूपये किंमतीच्या मुंबई येथील ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीच्या तीन खोल्या गावच्या मालकीच्या करून देण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नेतृत्वाखालील लेझीम पथकाला महाराष्ट्राच्या प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली होती.
हेब्बाळ -जलदयाळ ग्रामस्थ मंडळ मुंबई ,नागरी निवारा रहिवासी संघ, गोरेगाव, शाहू प्रतिष्ठान, कोल्हापूर, पोस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि शाहीर पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.