सत्यजित कदम शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:45 IST2025-03-08T11:44:57+5:302025-03-08T11:45:38+5:30
ठाकरे भवन उभारण्याची जबाबदारी

सत्यजित कदम शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्यजित उर्फ नाना कदम यांची शिवसेनाकोल्हापूर जिल्हा समन्वयक (ग्रामीण-शहरी) म्हणून शुक्रवारी नियुक्ती केली. याबाबत मुंबईत शुक्रवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. एक वर्षासाठी ही नियुक्ती आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांशी समन्वयाची जबाबदारी कदम यांच्यावर देण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कदम यांनी राजेश क्षीरसागर यांच्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. भाजपमध्ये फारशी संधी दिसत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
गेल्या सहा महिन्यात कदम यांनी एकीकडे संघटना आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवला. याचीच दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले.
ठाकरे भवन उभारण्याची जबाबदारी
कदम यांच्यावर जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे भवन उभारण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शहरात पक्षाचे जिल्हा कार्यालय म्हणून हे भवन उभारण्यात येणार असून त्यासाठीही कदम यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.