शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील पुणे शहर, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक; काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:36 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्ती

कोल्हापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी त्यांची नियुक्ती केली आहे.सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुण्यासाठी निरीक्षकपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे जाऊन तालुकाध्यक्ष, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करावी, तालुकानिहाय बैठका घ्याव्यात आणि १५ दिवसांत अहवाल द्यावा, असे पाटील यांना पाठविलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे. जिल्ह्याच्या पक्षप्रभारींना सोबत घेऊन, त्यांना दौऱ्यातही सोबत घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून अहवाल पाठवावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काँग्रेसच्या नेमक्या स्थितीचा अहवाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील