महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सतेज पाटील अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:18+5:302021-04-06T04:23:18+5:30
(सतेज पाटील यांचा फाईल फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पुणे येथे रविवारी (दि. ४) झालेल्या महाराष्ट्र तलवारबाजी ...

महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सतेज पाटील अध्यक्ष
(सतेज पाटील यांचा फाईल फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पुणे येथे रविवारी (दि. ४) झालेल्या महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने अध्यक्षपदी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची निवड झाली. ही निवड भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षा व निरीक्षक अनघा वरळीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संघटनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन व संकेतस्थळाचे उद्घाटन भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव व भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्याहस्ते झाले. राजीव मेहता म्हणाले, तलवारबाजी खेळाचा महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत केलेला प्रचार व प्रसार निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात तलवारबाजी खेळ पोहोचला आहे. खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. अनेक खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महाराष्ट्र तलवारबाजी खेळाडूंच्या विकासासाठी विविध विभागातील जिल्ह्यांमध्ये तलवारबाजी खेळाचे अत्याधुनिक स्टेडियम व क्रीडासाहित्य उपलब्ध करून दिले जाईल. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेऊ.
यावेळी राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काठोळे, मुख्य सल्लागार अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी यांच्यासह २८ जिल्ह्यांतील एकूण ५० प्रतिनिधी उपस्थित होते.