सतेज पाटील यांनी केली शहरात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:13 IST2020-08-05T23:10:47+5:302020-08-05T23:13:21+5:30
काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाच्या अनुषंगाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट मुंबईहून येत शहर परिसरात आज पाहणी केली.

सतेज पाटील यांनी केली शहरात पाहणी
कोल्हापूर- काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाच्या अनुषंगाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट मुंबईहून येत शहर परिसरात आज पाहणी केली.
शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.
याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक शारंगधर देशमुख व राहुल चव्हाण यांच्यासोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.