शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 12:09 IST

'पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या बंटी पाटील यांनी कोल्हापूरात साधे संडास देखील बांधले नाही'

भादोले: विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी, चंद्रकांत पाटील, संजय पाटील आणि सतेज पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनीही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू, असा ‘शब्द’ मला दिला होता. त्यानुसार मी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली. राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणात वेळी मी त्यांना त्यांनी दिलेल्या ‘शब्दा’ची आठवण करून दिली होती. पण दुर्दैवाने बंटी पाटलांची ‘शब्द’ फिरवून सभासदांवर निवडणूक लादली आहे. पण मी महाडिकांना दिलेला ‘शब्द’ पाळणार आहे, असे विनय कोरे यांनी कुंभोज येथे सांगितले. यावेळी त्यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला. खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांनी लादलेली ही निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. केवळ विरोधाला विरोध करण्याचे राजकारण करणाऱ्यांनी आता पराभवाची तयारी ठेवावी, असा टोलाही लगावला. यावेळी कुंभोजच्या सरपंच जयश्री जाधव,माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, बाबासाहेब पाटील, अरुण पाटील, शंकरराव पाटील, उत्तम पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने ,दिलीप पाटील, सुरेश पाटील, भास्कर शेटे, राजकुमार भोसले,अनिकेत चौगुले यांच्यासह विविध मान्यवर, राजाराम कारखान्याचे सभासद, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमतची बातमी योग्यबिंदू चौकात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकारासंदर्भात लोकमत मधून आलेल्या बातमीचा उल्लेख करुन खासदार महाडिक म्हणाले, इर्षा विकासासाठी असावी हे बरोबर आहे पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या बंटी पाटील यांनी कोल्हापूरात साधे संडास देखील बांधले नाही. परंतू मी केलेल्या बास्केट ब्रिजला हिणवले गेले.हीच घाणेरडी प्रवृत्ती सहकार नासवत असून याला वेळीच जागा दाखवणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकVinay Koreविनय कोरेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक