सरपंच आरक्षणप्रश्नी सुनावणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:20+5:302021-02-05T06:59:20+5:30

कुरुंदवाड : शिरटी व मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण प्राथमिक दर्शनी नियमानुसार झाले आहे, असे दिसत ...

Sarpanch reservation order hearing order | सरपंच आरक्षणप्रश्नी सुनावणीचे आदेश

सरपंच आरक्षणप्रश्नी सुनावणीचे आदेश

कुरुंदवाड : शिरटी व मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण प्राथमिक दर्शनी नियमानुसार झाले आहे, असे दिसत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सुनावणी घ्यावी व ९ तारखेची सरपंच पदाची निवडणूक पुढे ढकलावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. ५) होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिरटी व मजरेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा करत याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. शाहरुख काथावाला व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मजरेवाडी येथील याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. मनोज पाटील, तर शिरटीतील याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. धैर्यशील सुतार यांनी बाजू मांडली.

Web Title: Sarpanch reservation order hearing order