कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संजय राजमाने, चंद्रकांत सूर्यवंशी निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:36 IST2021-06-01T10:34:52+5:302021-06-01T10:36:25+5:30
Zp Kolhapur- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने आणि जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे दोघेही विभागप्रमुख सोमवारी निवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संजय राजमाने, चंद्रकांत सूर्यवंशी निवृत्त
कोल्हापूर- जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने आणि जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे दोघेही विभागप्रमुख सोमवारी निवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
राजमाने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी येथील आहेत. तर सूर्यवंशी हे हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील आहेत. जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या दोघांना निरोप देण्यात आला.
करवीरचे सहा. गटविकास अधिकारी शरद भोसले, आजऱ्याचे सहा. गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक विजय मगदूम, आरोग्य अधीक्षक महादेव झलग, शिरोळ पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बी. पी. कांबळे, आरोग्य वरिष्ठ सहायक विकास लाड यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.