लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच कर्नाटकात जाण्याची सुळकूडवर वेळ : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:38 AM2018-09-15T00:38:58+5:302018-09-15T00:39:32+5:30

पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या

Sanjay Pawar on the helm of Karnataka due to irregularity of people's representatives | लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच कर्नाटकात जाण्याची सुळकूडवर वेळ : संजय पवार

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच कर्नाटकात जाण्याची सुळकूडवर वेळ : संजय पवार

Next
ठळक मुद्देधनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांचे अपयश

कोल्हापूर : पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गावावर ही वेळ आल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला; तर राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन सर्व योजना येथे राबवाव्यात, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.

संजय पवार म्हणाले, या गावाने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून, येथील खासदार व आमदारांचे हे अपयश आहे. विकासकामांचे फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या या लोकांनी नेमका कोणता विकास केला हा प्रश्न उपस्थित होत आहे. आदर्श ग्राम योजनेतील गावे निवडताना खासदार व आमदारांनी मते किती आहेत याचाच विचार केला आहे. त्यामुळे कर्तृत्व दाखवायचे असेल तर अशी गावे त्यांनी दत्तक घेऊन आपले कर्तृत्व दाखवावे.

विजय देवणे म्हणाले, या गावाला पायाभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून त्याने कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत अनेक हुतात्मे झाले आहेत. त्यामुळे हा ठराव रद्द करावा यासाठी शिवसेनेने सरपंच लक्ष्मीकांत पाटील यांना विनंतीपत्र दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, विद्या गिरी, दिनकर जाधव, दीनानाथ चौगुले, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते.

सुळकूडप्रश्नी मंगळवारी बैठक
गावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी राधानगरी-कागल प्रांताधिकाºयांना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विजय देवणे यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी  सुळकूडला भेट द्यावी
पालकमंत्री व सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी माणसाच्या हितासाठी या गावाला भेट द्यावी व राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन येथील विकासकामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी देवणे यांनी केली.

Web Title: Sanjay Pawar on the helm of Karnataka due to irregularity of people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.