संजय मंडलिकांना कार्यकर्त्यांचा गराडा ;पालकमंत्र्यांनी भरवला पेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:34 PM2019-05-24T16:34:00+5:302019-05-24T16:38:06+5:30

नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांना शुभेच्छा देण्यासाठी रुईकर कॉलनीतील बंगल्यात शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतन खासदारांना पेढा भरवून तोंड गोड केले.

Sanjay Mandalikar activists' clutches; | संजय मंडलिकांना कार्यकर्त्यांचा गराडा ;पालकमंत्र्यांनी भरवला पेढा

कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत नुतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांची शुक्रवारी भेट घेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरविला. यावेळी विरेंद्र मंडलिक, सुनिल मोदी, संदीप देसाई, माणिक मंडलिक, राहुल चिकोडे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे उपस्थित होते. (छाया आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे‘दादा...आता मंत्रीपदाच बघा’ अशी प्रेमळ गळ उपस्थित कार्यकर्त्यांनी घालत वातावरणात आणखी उत्साह आणला.

कोल्हापूर : नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांना शुभेच्छा देण्यासाठी रुईकर कॉलनीतील बंगल्यात शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतन खासदारांना पेढा भरवून तोंड गोड केले. ‘दादा...आता मंत्रीपदाच बघा’ अशी प्रेमळ गळ उपस्थित कार्यकर्त्यांनी घालत वातावरणात आणखी उत्साह आणला.
खा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार मतांची आघाडी घेत, ऐतिहासिक विजय मिळविला.

भाजप-शिवसेना महायुतीसह कागलच्या मंडलिक गटात या विजयाने स्फूर्लींग भारले. गुरूवारी (दि.२३) दुपारी बारा वाजता लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होताच रुईकर कॉलनीतील मंडलिक निवास गर्दीने फुलून गेले. रात्री दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सव्वासात वाजता प्रा. मंडलिक हॉलमध्ये आले. यानंतर कागल, मुरगुड, चंदगड, शहरातील कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देवून सदिच्छा व्यक्त केल्या.
दहा वाजता पालक मंत्री चंद्रकांत पाटील आले. त्यांनी प्रा. मंडलिक यांना पेढा भरवत आनंद व्यक्त केला. महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने राबल्यानेच विजय मिळाला. महायुतीची ही ताकद यापुढेही दिसेल, अशी उभयतांमध्ये चर्चा झाली.

यावेळी विद्याप्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यी संदीप देसाई, व्ही. बी. पाटील, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, माणिक मंडलिक, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, सुनिल मोदी उपस्थित होते. प्रा. मंडलिक यांना भेटण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. वैशाली मंडलिक यांना भेटून महिला आनंद व्यक्त करीत होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत व त्यानंतर रात्री उशीरापर्यंत कार्यकर्त्यांची वर्दळ होती.

राष्टय नेतृत्वान आता तरी ध्यानात ठेवाव
प्रा. मंडलिक म्हणाले, दिवगंत सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात २००९साली राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जीवाचं रान करुनही हताश व्हाव लागल. यातून कोणताही धडा न घेता, २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेन ठरविलं असतानाही मी ध्यानात ठेवलय असे म्हणत, राष्टय नेतृत्वानं सहा-सहावेळा दौरा केला. आतातरी २०१९च्या कोल्हापूरातून या नेतृत्वाना धडा घेवनू ध्यानात ठेवाव.

 

Web Title: Sanjay Mandalikar activists' clutches;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.