शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

संग्राम पाटील ‘कुंभी-कासारी’चा मानधनधारक प्रेक्षणीय लढतीत संग्रामला अमित कारंडेची कडवी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:56 AM

कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या २७व्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत संग्राम पाटील (देवठाणे) याला कडवी लढत दिल्यानंतरही अमित कारंडेला

कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या २७व्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत संग्राम पाटील (देवठाणे) याला कडवी लढत दिल्यानंतरही अमित कारंडेला (सावर्डे दुमाला) १३ विरुद्ध ७ गुणांनी हार मानावी लागली. या अंतिम लढतीने सात हजार प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तिसरा क्रमांक धनाजी पाटील (देवठाणे) याने मिळविला. विजेत्या १२ गटांतील मल्लांसह संग्राम पाटील यांचा ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष दादासो लाड यांच्या हस्ते मानचिन्ह, ट्रॅकसूट, रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

पै. युवराज पाटील कुस्ती संकुलाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आखाड्यात सोमवारी सकाळी झालेल्या खुल्या गटातील संग्राम पाटील विरुद्ध अमित कारंडेच्या कुस्तीस सलामी होताच अमितने आक्रमक होत संग्रामचा एकेरी पट काढत चार गुणांची आघाडी घेतली. यानंतर मात्र संग्रामने आक्रमक होत प्रतिडाव करीत गुण वसूल केले. संग्रामने नऊ गुण मिळवीत पहिल्या हाफमध्ये ९ विरुद्ध ६ गुणांची आघाडी घेतली. दुसºया हाफमध्ये संग्रामने चार गुण मिळवून अमितवर १३ विरुद्ध ७ गुणांनी विजय मिळवीत ‘कुंभी-कासारी’चा मानधनधारक होण्याचा मान मिळविला.

८४ किलो वजन गटात झालेल्या शुभम पाटील (कोगे) विरुद्ध नीलेश पोवार यांच्यातील कुस्तीत नीलेशने विजय मिळविला.७४ किलो वजन गटात स्वप्निल पाटील (वाकरे) याने माणिक कारंडे (सावर्डे दुमाला) याच्यावर तीन विरुद्ध एक अशा गुणफरकांनी निसटता विजय मिळविला, तर ६६ किलो वजन गटात विश्वजित पाटील (कोगे) आणि दीपक कांबळे (आमशी) यांच्यातील अटीतटीच्या लढतीत विश्वजितने विजय मिळविला.

विविध गटांत विजयी तीन क्रमांकाच्या मल्लांची नावे :गट २५ किलो- १) प्रतीक वरुटे (कसबा बीड), २) तन्वीर चौगले (पासार्डे) ३) अदित्य फाटक (कोगे)गट ३० किलो १) आविष्कार पाटील (आमशी), २) सोमनाथ साळोखे (भामटे) ३) मनीष पाटील (भामटे)गट ३५ किलो १)आदर्श पाटील (आमशी), २) सचिन चौगले (पुनाळ) ३) ऋत्विक लाड (आळवे)गट ४० किलो १)करणसिंह देसाई (भामटे), २) प्रतीक पाटील (आमशी) ३) समर्थ पाटील (उपवडे)गट ४५ किलो १) ओंकार पाटील (कळंबे) २)स्वप्निल पाटील (बोलोली) ३) अनुप पाटील (आमशी)गट ५० किलो १) महेश पाटील (आमशी) २) विनायक मोळे (घरपण) ३)वैभव पाटील (म्हारूळ)गट ५५ किलो १) विक्रम मोरे (कोगे) २)शुभम पाटील (खुपिरे) ३) ऋृषीकेश पाटील (कुडित्रे)गट ६० किलो १) विश्वजित पाटील (कोगे) २) दीपक कांबळे (आमशी) ३)रोहन शेलार (कोलोली)गट ६६ किलो १) विजय पाटील (पासार्डे) २)नितीन पोवार (वाकरे) ३)हृदयनाथ पाचाकटे (पाचाकटेवाडी)गट ७४ किलो १) स्वप्निल पाटील (वाकरे) २) माणिक कारंडे (सावर्डे दुमाला) ३) अमोल कोंडेकर (कुडित्रे)गट ८४ किलो १) नीलेश पोवार (वाकरे) २) शुभम पाटील (कोगे) ३) किरण मोरे(कोगे)खुला गट —१) संग्राम पाटील (देवठाणे) २)अमित कारंडे (सावर्डे दुमाला) ३)धनाजी पाटील (देवठाणे)पुढील वर्षी मानधनात मोठी वाढ करणार : नरकेदिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि खुराकाचा खर्च पाहता पुढील वर्षी मानधनात मोठी वाढ केली जाईल, अशी घोषणा चंद्रदीप नरके यांनी केली. महाराष्ट्र केसरी व आॅलिम्पिकचे ध्येय समोर ठेवा, असे आवाहनही त्यांनी पैलवानांना केले.उपविजेत्यांनादोन किलो तूपकोपार्डे (ता. करवीर) येथील केशव पाटील यांनी विजेत्या मल्लांना रोख बक्षीस व उपविजेत्या मल्लांना दोन किलो तूप देऊन कुस्तीसाठी एक चांगला पायंडा पाडला आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर