शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम कुपेकर अखेर शिवसेनेत

By admin | Updated: July 9, 2015 00:43 IST

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश : वर्षभरातील विविध पर्यायांच्या चाचपणीनंतर निर्णय

  कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्राम कुपेकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी हातात शिवबंधन बांधले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बंडखोरी करत जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे चंदगडमधून निवडणूक लढविली होती. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या हाताला धरून राजकारणात प्रवेश केलेले संग्राम कुपेकर यांनी अल्पावधीत आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक गडहिंग्लज तालुक्यात दाखविली. गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी आक्रमकपणे काम केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी तयारी केली होती; पण राष्ट्रवादी काँग्रेसने संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम कुपेकर यांनी उमेदवारीसाठी शर्तीचे प्रयत्न केले होते; पण राष्ट्रवादी काँग्रेस व कुपेकर घराण्यातील अंतर्गत राजकारणातून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी जनसुराज्य पक्षाचा नारळ हातात घेऊन विधानसभेची निवडणूक लढस्रवली. त्यानंतर गेले वर्षभर ते विविध पर्यायांची चाचपणी करत होते, अखेर बुधवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथील सेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, भैयासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, शिवाजीराव हिडदुग्गी, कृष्णराव वार्इंगडे, शेखर गावडे यांच्यासह चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) लवकरच मोठी जबाबदारी संघटनात्मक वाढीसाठी तरुण कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. संग्रामसारख्या आक्रमक कार्यकर्त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम होईल. लवकरच त्यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, जेणेकरून संघटनावाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. संघटनात्मक काम करण्यासाठी शिवसेना चांगला पक्ष असल्याने जनतेच्या इच्छेखातर हा निर्णय घेतला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना भक्कम करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असून, कोणत्याही परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार करण्यासाठी जिवाचे रान करणार आहे. - संग्राम कुपेकर