सांगाव रुग्णकल्याण समिती आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST2021-03-25T04:24:06+5:302021-03-25T04:24:06+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी स्वत: आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन लसीकरणासाठी नागरिकांना बाहेर ...

सांगाव रुग्णकल्याण समिती आढावा बैठक
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी स्वत: आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन लसीकरणासाठी नागरिकांना बाहेर काढावे असे आवाहन केले.
या वेळी तालुका आरोग्याधिकारी डाॅ. अभिजित शिंदे यांनी ३१ मार्चअखेर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किमान पन्नास टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी नियोजन व उपाययोजनेबाबत माहिती दिली आणि तीन उपकेंद्रांमधूनही लसीकरण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्याचे सांगितले.
एकूण ६० वर्षे वयोगटावरील नागरिकांची संख्या ७८५७ असून त्यांपैकी आतापर्यंत फक्त ११९७ लोकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण फक्त ७ टक्के इतकेच आहे. याबाबत युवराज पाटील व डाॅ. शिंदे यांनी खंत व्यक्त केली.
या बैठकीस मौजे सांगावचे सरपंच विजयसिंहराव पाटील, लिंगनुर दु. सरपंच वंदना बागडे, पूजा मोरे व्हन्नूर, सविता हिरेमठ वंदूर, आदींसह सरपंच, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका व उपकेंद्रातील सहायक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड शूल्ट्रझ लस घेताना जि.प. सदस्य युवराज पाटील, सोबत पंचायत समिती सदस्या राजश्री भोजे, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. अभिजित शिंदे, वैद्यकीय अधिकारी पूर्णिमा शिंदे, आरोग्यसेविका कोळी, आदी उपस्थित होते.