शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५० वर्षे चंदनाची झाडं जपली, चोरट्यांनी रात्रीत तोडली; मडिलगे परिसरात 'पुष्पा' गँगचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 16:34 IST

झाडे तोडून घेऊन जाताना पिकांमध्ये धुडगूस

सदाशिव मोरे आजरा : तालुक्यात चंदनाची झाडे तोडण्याची टोळी सक्रिय झाली आहे. मडिलगे व खेडे परिसरातील अंदाजे १०० ते १२५ झाडे चंदन चोरट्यांनी लंपास केली आहेत. बांधावर असलेली व गेल्या ५० वर्षांपासून सांभाळलेली चंदनाची झाडे रातोरात चोरली जात असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांकडून दिवसा टेहळणी व रात्री झाडांची कत्तल केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मडिलगे, खेडे, हाजगोळी, भादवण परिसरांत शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. शेतकरी आपल्या पिकाप्रमाणे या चंदनाच्या झाडांचा सांभाळ करीत आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांकडून चंदनाच्या झाडावर धारदार ब्लेडद्वारे डल्ला मारला जात आहे. काही शेतकऱ्यांच्या घराजवळील झाडेही चोरट्यांनी लंपास केली आहेत. चोरटे रात्री बारानंतर दिवसा टेहळणी केलेल्या झाडांवर ब्लेडच्या साहाय्याने डल्ला मारतात. सुरुवातीला झाडांमध्ये केत आहे की नाही हे पाहिले जाते. केत नसलेली काही झाडे अर्धवट स्थितीत कापूनही चोरट्यांनी ठेवली आहेत. झाडे तोडून घेऊन जाताना पिकांमध्ये धुडगूस घातला जात आहे. शेतकऱ्यांची दहा फुटांपासून वीस फुटांपर्यंत उंचीची चंदनाची झाडे लंपास केली जात असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. जंगली प्राण्यांच्या भीतीने शेतातील रात्रीची राखणदारी बंद झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चंदनाची झाडे तोडण्याची संधी शोधली आहे.

शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी पिकांबरोबर झाडांची ही रखवाली करण्यास सुरुवात करावी. सर्वांनी मिळून राखण केल्यास पिकांबरोबर चंदनाची झाडेही सुरक्षित राहतील. - विष्णू पाटील - शेतकरी खेडे, ता. आजरा.चंदनाची झाडे तोडण्यास मनाई आहे. वनविभागाच्या परवानगीशिवाय अशी झाडे तोडल्यास व चोरटे सापडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - स्मिता डाके - वनक्षेत्रपाल, आजरा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस