शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

Kolhapur: मोक्का गुन्हेगार देशपांडे गांजा विकताना अटक, तीन किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:50 IST

राजारामपुरी पोलिसांची कारवाई 

कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार सनत प्रताप देशपांडे (वय ३४, रा. राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी गांजा विकताना अटक केले. त्याच्याकडून ७८ हजार रुपयांचा गांजा आणि मोबाइल असा सुमारे ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) रात्री पावणेबाराच्या सुमारास राजारामपुरीत ११ व्या गल्लीतील एका मेडिकलसमोर झाली.राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनत देशपांडे हा गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा राजारामपुरीतील ११ व्या गल्लीत एका मेडिकलसमोर देशपांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.अंगझडतीत त्याच्याकडे ३ किलो गांजा मिळाला. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी गांजा आणल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील ३ किलो गांजा आणि मोबाइल जप्त केला. त्याने कोणाकडून गांजा आणला, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्यासह सहायक फौजदार समीर शेख, हवालदार अरविंद पाटील, अंमलदार संदीप सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील, आदींच्या पथकाने कारवाई केली.देशपांडे मोक्कातील आरोपीअटकेतील सनत देशपांडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राजारामपुरी आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गांजा विक्रीसह मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. गांजा विक्रीच्या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही साथीदारांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस