शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:44 IST

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.बुधवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या पातळीवर कोणतीही नवी घडामोड नव्हती. मुंबईत थांबून ते विविध लोकांच्या संपर्कात होते. शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे टाकत संजय पवार यांचा अर्ज दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे ही कोंडी कायम राहिली. तुमचा आम्ही जरूर सन्मान करू; परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा..तुम्हाला आमची मते तर हवीत आणि पक्षीय बांधीलकी नको हे कसे चालेल या भूमिकेवर शिवसेना ताठर आहे. त्यामुळेच त्यांनी हेतुपुरस्सर कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे.

कोणत्याच पक्षाने पाठबळ दिले नाही तर संभाजीराजे यांच्यापुढे या लढतीतून माघार घेण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पक्षीय पाठबळ नसेल, तर हे आमदार आणणार कोठून, हा प्रश्नच आहे. महाविकास आघाडीत आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत.

लढायचेच झाले तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यातून ते कोणत्या मार्गाने पुढे जातात यावर त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरणार आहे. संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले; परंतु त्यांच्या खासदारकीचा भाजपला पक्ष म्हणून काडीमात्र फायदा झाला नाही. हा अनुभव असल्यानेच शिवसेनेने पक्षीय उमेदवारीचा आग्रह धरला आहे.

शरद पवार यांच्यावर मर्यादा...

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील का, अशीही चर्चा सुरू आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. कारण ही जागाच शिवसेनेची आहे.
  • मागील दोन वर्षांपूर्वी स्वत: पवार व फौजिया खान यांच्या राज्यसभेवरील निवडीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांना दिली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते सहसा बदलत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने उमेदवारीचा विषय संपल्यात जमा आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार