Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 03:01 PM2022-05-24T15:01:30+5:302022-05-24T16:58:40+5:30

Exclusive Interview: थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही, अशी ठाम भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

sambhaji raje chhatrapati said rajya sabha election will fight as an independent in lokmat exclusive interview | Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार

Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार

googlenewsNext

विश्वास पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: शिवसेना असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, मी त्या पक्षांत थेट प्रवेश करणार नाही. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचे निश्चित केले असून, या पक्षांनी मला पाठिंबा द्यावा हीच ठाम भूमिका घेऊन मी पुढे जात आहे. महाविकास आघाडीने माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्यास माझी तयारी आहे. परंतू, थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मंगळवारी दुपारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. खासदारकीसाठी मी अगतिक आहे, असे अजिबातच नाही. शिवशाहूंचा विचार, मराठा व बहुजन समाजाचे प्रश्र्न घेवून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून माझे कार्य सुरुच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाजीराजे म्हणाले की, मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही. परंतू तशा कोणत्याही घडामोडी अजून तरी दिसत नाहीत. जे पक्ष उमेदवारीस पाठिंबा देतील, त्या पक्षांना सहयोग असू शकेल. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोगी सदस्यत्व नव्हे. त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हटल्यावर सभागृहात त्या पक्षांच्या धोरणांना पाठिंबा, मतदान त्या पक्षाच्या बाजूने या गोष्टी मला मान्य असतील. परंतू थेट कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्विकारणार नाही. खासदार होवो अगर न होवो.. माझी यापुढील वाटचाल स्वराज्य संघटनेचे काम करतच सुरु राहील असे सांगून ते म्हणाले, मी माझी भूमिका राजकीय पक्षांसमोर मांडली आहे. त्यांनी त्यावर निर्णय घ्यायचा आहे. मी गेली दहा वर्षे समाजासाठी जे काम करत आहे त्याची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठबळ द्यावे ही माझी सर्वसमावेशक भूमिका आहे.
 

Read in English

Web Title: sambhaji raje chhatrapati said rajya sabha election will fight as an independent in lokmat exclusive interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.