पाण्याच्या शोधात विहिरीत पडले सांबर, शेतकरी व प्राणीमित्रांनी दिलं जीवदान; गडहिंग्लज तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:31 IST2022-03-10T18:31:25+5:302022-03-10T18:31:50+5:30
हलकर्णी : पाण्याच्या शोधात रस्त्याकडेच्या विहिरीत पडलेल्या सांबराला शेतकरी व प्राणीमित्रांनी जीवदान दिले. गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी -बसर्गे मार्गावर ही ...

पाण्याच्या शोधात विहिरीत पडले सांबर, शेतकरी व प्राणीमित्रांनी दिलं जीवदान; गडहिंग्लज तालुक्यातील घटना
हलकर्णी : पाण्याच्या शोधात रस्त्याकडेच्या विहिरीत पडलेल्या सांबराला शेतकरी व प्राणीमित्रांनी जीवदान दिले. गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी -बसर्गे मार्गावर ही घटना घडली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोरखंडाच्या सहाय्याने सांबराला जीवनदान देण्यात यश आले.
येणेंचवंडी हद्दीतील आप्पासो कोळी यांच्या विहीरीतून ओरडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर विहिरीत डोकावून पाहिले असता पूर्ण वाढ झालेले सांबर विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. आनंदा कोळी, सागर शिंदे, कांचन कुमार घस्ती, इरापा गवळी, संभाजी कांबळे, प्राणीमित्र मेहबूब सनदी, रणजीत सावंत यांनी दोरखंडाच्या सहाय्याने सांबराला पाण्यातून बाहेर काढून जीवनदान दिले.
पशुवैद्यकिय अधिकारी वरुण धूप यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. वनपाल रणजीत पाटील, बी. एल. कुंभार, सुनिल भंडारी यांनी सांबराला आजरा वनविभागाच्या ताब्यात देवून त्याच्या अधिवासात सोडले. संबधित सांबर हे दोन वर्षे वयाचे हे भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयातील असावे असा अंदाज प्राणीमित्रांनी वर्तवला असून अन्नाच्या शोधात ते भरकटले आहे.