बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:21 IST2019-05-08T16:20:06+5:302019-05-08T16:21:24+5:30

पैसे न देता रिचार्ज केलेले मोबाईल कॉर्ड बंद केल्याच्या रागातुन सेल्समनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खूनी हल्ला केला. विनायक विठ्ठल व्हस्कटे (वय २५,रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.

Salesman Gambhir, after breaking the bottle of beer | बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीर

बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीर

ठळक मुद्देबिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीरमोबाईल रिचार्जचे पैसे मागितलेचा राग व संशयित प्रेम वायदंडेवर गुन्हा

कोल्हापूर : पैसे न देता रिचार्ज केलेले मोबाईल कॉर्ड बंद केल्याच्या रागातुन सेल्समनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खूनी हल्ला केला. विनायक विठ्ठल व्हस्कटे (वय २५,रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीसांनी फाळकुटदादा प्रेम चंद्रकांत वायदंडे (रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याचेवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (दि. ७) घडला.

पोलीसांनी सांगितले, राजारामपुरी सहावी गल्ली येथे सागर कस्टम हाऊस मोबाईल दूकान आहे. जखमी विनायक व्हस्कटे हा याठिकाणी सेल्समन म्हणून नोकरीला आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित प्रेम वायदंडे दूकानात आला. त्याने मोबाईलचे रिचार्ज मारुन पैसे न देता निघून गेला. त्यामुळे व्हस्कटे याने त्याचे मोबाईलचे कार्ड बंद केले. त्यानंतर तो पुन्हा दूकानात आला.

कार्ड बंद केल्याची विचारणा करुन आमचेकडे पैसे मागायचे नाहीत, आम्ही भाई लोक आहोत, तुमचे दूकान फोडीन अशी धमकी देऊन बिअरची बाटली व्हस्कटे याच्या डोक्यात फोडली. रक्तबंबाळ अवस्थेत व्हस्कटेला अन्य कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये दाखल केले.

त्यानंतर संशयितावर राजारामपुरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला. वायदंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर राजारामपुरी, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Salesman Gambhir, after breaking the bottle of beer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.