शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:06 IST

वाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे.

तानाजी पोवारकोल्हापूर : पन्नास हजारापासून १० लाख रुपयापर्यतची रक्कम घेऊन विनाकागदपत्रांच्या चारचाकी जुनी वाहने कोल्हापूर शहरासह करवीर, राधानगरी तालुक्यात अनेकांच्या माथी मारून एका वाहन एजंटाने अनेकांना लाखो रुपयाचा चुना लावला. वारंवार मागूनही वाहनांची कागदपत्रे मिळत नसल्याने सुमारे ५० हून अधिक खरेदीदार हवालदिल झाले आहेत. कागदपत्रे देण्यास एजंटाकडून टाळाटाळ होऊ लागल्याने ही वाहने चोरीची तर नसतील ना? अशी शंका प्रत्येकाच्या मनात येऊ लागली आहे. गुडाळ (ता. राधानगरी) येथील या वाहन एजंटाचा प्रताप आता चव्हाट्यावर आला आहे.गुडाळ येथे सात-आठ वर्षे वाहन विक्री करणाऱ्या एजंटने आपले बस्तान बसवले आहे. गेल्या दोन वर्षात त्याने कोल्हापूर शहरात ०६, करवीर तालुक्यात ०७ तर राधानगरी तालुक्यात २६ वाहने आदी ठिकाणी मुंबई परिसरातून आणलेली चारचाकी वाहने पैसे घेऊन विक्री केली. कोल्हापुरातील जुन्या वाहन बाजारपेठेपेक्षा २५ हजार रुपये कमी दराने ही वाहने मिळत असल्याने अनेकांनी खरेदी केली. पण कागदपत्रे देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होऊ लागल्याने खरेदीदार हवालदिल झाले. वाहने खरेदीदारांनी ५० हजार रुपयापासून १० लाख रुपयापर्यतच्या रकमा एजंटला दिल्या, पण त्याने दोन वर्षात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने वाहन खरेदीदार वैतागले.

जरा थांबा; फायनान्सची गाडीची कागदपत्रे उशिरा मिळतात

गाडी खरेदी करताना त्याची पूर्ण रक्कम एजंट घेतो, फायनान्सची गाडी असल्याने त्याची कागदपत्रे उशिरा मिळतात असे कारण सांगून त्याच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्याने अनेकांना कागदपत्रे देतो असे सांगून दोन वर्षे टोलवले आहे.

मंत्रालयातील ओळखीचा धाकवाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे. ‘माझे कोणी वाकडे करू शकत नाही’ असेही पठाणी भाषेत बोलून तो खरेदीदारालाच दमदाटी करत असल्याचे चित्र आहे.

पोलीसही अनभिज्ञ

गेले दोन वर्षे हा विनाकागदपत्रांचा वाहन विक्रीचा व्यवहार होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. संबंधित वाहनांचे पासिंग हे वाशी, पनवेल या भागातील आहेत. बहुदा ही वाहने चोरीची असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे, पण त्याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीcarकारtheftचोरी