कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पाहिले शाकाहारी 'आयर्न मॅन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:38 PM2019-12-12T16:38:24+5:302019-12-12T16:57:01+5:30

कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे 'आयर्न मॅन' ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Sahil Chauhan from Kolhapur sees vegetarian 'Iron Man' | कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पाहिले शाकाहारी 'आयर्न मॅन'

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पाहिले शाकाहारी 'आयर्न मॅन'

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पाहिले शाकाहारी 'आयर्न मॅन'२२६ किमीचे अंतर १३ तास ४५ मिनीटांत पूर्ण

कोल्हापूर : कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे 'आयर्न मॅन' ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

'वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आयर्न मॅन २०१९' ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे पार पडली. एकूण २२६ किमी चे असणारे अंतर चौहान यांनी १३ तास ४५ मिनीटांत पूर्ण केले. यामध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे असे प्रकार त्यांना १७ तासांमध्ये पूर्ण करायचे होते.

साहिल यांचे इंग्लंड येथून मास्टर ऑफ इंजिनीरिंग शिक्षण झाले आहे, चौहान यांना यासाठी निळकंठ आखाडे, दीपक राज, निल डी-सिल्वा यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Sahil Chauhan from Kolhapur sees vegetarian 'Iron Man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.