शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

: मंत्री, खासदार, आमदारांनी केला सर्व्हे, चौपदरी रस्त्यातील त्रुटी दूर होणार कागल : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग ...

: मंत्री, खासदार, आमदारांनी केला सर्व्हे, चौपदरी रस्त्यातील त्रुटी दूर होणार

कागल : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यानंतर रस्ते सुरक्षा वाढेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कागल ते घुणकी दरम्यान सहापदरीकरणाच्या कामाचा सर्व्हे केला.

चौपदरीकरण कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. याबद्दल कागलमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन करत तीव्र आंदोलनही केले होते. ही कामे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अशीच अवस्था अन्य ठिकाणीही असल्याने आज ही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अधिकारी वर्गाला सूचना केल्या. बोगदे, उड्डाणपूल, दुभाजक, सर्कल, सर्व्हिस रस्ते गटर्स याबद्दल ही चर्चा झाली. तसा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, महामार्ग कृती समिती कागलचे अध्यक्ष भय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, आनंदराव पसारे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत , संग्राम लाड, संग्राम गुरव यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, सर्वेअर व्ही. एन. पाटील काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट 1)

● कागलजवळ भराव नको...

कागल बसस्थानकाजवळील भुयारी मार्गाचे चौपदरीकरण होईल. येथे भराव न टाकता उड्डाण पुलासारखी खाली जागा रिकामी ठेवावी, अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केली. आर.टी.ओ चेक पोस्ट भुयारी मार्ग मोठा करणे, मुरगुड नाका उड्डाण पूल, जोड पूल नवा बांधणे. एसटी आगारासमोर भुयारी मार्ग अशा विविध कामांचा समावेश या वेळी करण्यात आला.

चौकट 2

● लक्ष्मी टेकडीवर उड्डाण पूल.

सर्वेक्षणावेळी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ लक्ष्मी टेकडीजवळ भेटले. सध्या या चौकातील वाहतुकीची धोकादायक स्थिती त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिली. लक्ष्मी मंदिरासमोर उड्डाणपुलासह सेवा रस्त्यांचीही आवश्यकता पटवून दिली. उंच टेकडीवर हा चौक असल्याने तो उकरून त्याची पातळी खाली आणुन त्यावर उड्डाण पुलाचा पर्याय सुचविण्यात आला.

--

महामार्ग सहापदरीकरण कामासाठी अधिकारी वर्गाला घेऊन कागल ते घुणकी दरम्यान आज लोकप्रतिनिधींनी विविध ठिकाणी सर्वेक्षण केले. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रकांत जाधव आमदार ऋतुराज पाटील, भय्या माने आदींनी ही पाहणी केली.