शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवाचे उद्यापासून अन्नछत्र, ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:05 IST

सेवाकार्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष

कोल्हापूर : चैत्र यात्रेला जोतिबा देवाच्या दर्शनाची आस घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी अहोरात्र अन्नदानाचे मोठे पुण्यकर्म करणाऱ्या सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र यंदादेखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. उपक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, १० ते १३ तारखेदरम्यान गायमुख येथे अन्नछत्र उभारले जात असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल, रोहित गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.श्री जोतिबाची चैत्र यात्रा यंदा शनिवारी (दि. १२) होत आहे. यात्रेकरूंसाठी डोंगरावरील गायमुख परिसरात अन्नछत्रासाठी १५ हजार चौरस फुटांचा मोठा मांडव तसेच चहा व मठ्ठ्यासाठी वेगळा मंडप घातला आहे. येथे भक्तांना २४ तास चहा, तर दुपारी मठ्ठा दिला जाईल. बैलगाडी घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलांसाठी शेंगदाणा पेंड व भुस्सा दिला जाणार आहे. जेवण करण्यासाठी २० मुख्य आचारी, मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० महिला, ५० वाढपी भांडी धुण्यासाठी ७० महिला, ताटे स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामांसाठी ५० श्रमिक; तसेच जेवण वाढण्यासाठी विश्वस्त, स्नेही, हितचिंतक असे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत. येथेच सीपीआर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिर तसेच नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. ज्या दानशूर व्यक्ती, संस्थांना या उपक्रमासाठी मदत करायची आहे, त्यांनी सहजसेवा ट्रस्ट, ३९८, आशिष चेंबर्स, बसंत-बहार सिनेमासमोर, स्टेट बँक कोषागार शाखा बिल्डिंग, शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.असे लागते साहित्यबासमती तांदूळ : १५ हजार किलो, तूरडाळ : ३ हजार किलो, रवा : ६ हजार किलो, साखर : १० हजार किलो, तेलाचे डबे : ५००, दूध : ७ हजार लिटर, बटाटा : ३ हजार किलो, कांदा : ४ हजार किलो, चहा पावडर : ३०० किलो, मूग, काळा घेवडा : प्रत्येकी ३०० किलो, लसूण : २०० किलो, लाकूड : ४ टन, गॅस सिलिंडर : २००; याशिवाय ट्रक भरून भाजीपाला, गोडा मसाला, चटणी व इतर मसाल्याचे पदार्थ.

वाहनांची मोफत सेवाकोल्हापूर वेध ट्रेनिंग टू व्हीलर मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून दोन दिवस ना दुरुस्त व पंक्चर झालेल्या दुचाकी वाहनांची मोफत सेवा देण्यात येणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून हे काम अखंडितपणे केले जाते. येत्या शुकवारी राधेय ऑटो, शनिवार पेठ येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ही सेवा शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस जोतिबा डोंगर येथे देण्यात येणार आहे. प्रा. वैभव पाटणकर, प्रवीण देवेकर, प्रशांत साळोखे, विनोद म्हाळुंगे, रवी चिले, संदीप पाटील, प्रशांत जाधव, संदीप कदम, अभी हणबर, शिवाजी लोहार यांच्यासह १००हून अधिक मेकॅनिक्स या उपक्रमात सहभागी असतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा