सा.बां.चा दिशादर्शक फलक देतोय अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:50+5:302021-04-06T04:22:50+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जयसिंगपूर कार्यालयामार्फत गणेशवाडी-शेडशाळ मार्गावर खातरकटी व डफळापूर कॉर्नरजवळ ‘पुढे तीव्र वळण आहे’, ‘पुढे गाव आहे’, ‘वाहने ...

सा.बां.चा दिशादर्शक फलक देतोय अपघाताला निमंत्रण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जयसिंगपूर कार्यालयामार्फत गणेशवाडी-शेडशाळ मार्गावर खातरकटी व डफळापूर कॉर्नरजवळ ‘पुढे तीव्र वळण आहे’, ‘पुढे गाव आहे’, ‘वाहने सावकाश चालवा’, अशा सूचना देणारे लोखंडी पत्र्याचे दिशादर्शक फलक काही दिवसांपूर्वी लावले आहेत. रस्त्याच्या बाजूला असणारे हे फलक एका बाजूला झुकले आहेत. यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. लोखंडी पत्र्याचे फलकांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
---------------------
कोट - सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले दिशादर्शक फलक निघून एका बाजूला झुकले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी बांधकाम विभागाने फलक व्यवस्थित रस्त्याच्या आतील बाजूस लावावेत.
- गजानन चौगुले, सरपंच, शेडशाळ
फोटो - ०५०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - गणेशवाडी- शेडशाळ मार्गावर अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला दिशादर्शक फलक झुकला आहे. (छाया - रमेश सुतार)