शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

एस. के. पाटील बँकप्रकरणी पोलीसप्रमुखांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:45 IST

या बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराविरोधात २००८ साली उच्च न्यायालयात ठेवीदारांनी याचिका दाखल केल्यानंतर सहकार खात्यामार्फत लेखापरीक्षक गोगटे आणि कंपनी यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दाखल केली व त्यानंतर ह्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करूनसुद्धा आरोपी मोकाट आहेत;

ठळक मुद्देउच्च न्यायालयात सुनावणी : संशयित अजूनही मोकाटच

कोल्हापूर : कुुरुंदवाड येथील एस. के. पाटील बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन, जिल्हा पोलीस प्रमुख, तसेच आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला आहे.

या बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराविरोधात २००८ साली उच्च न्यायालयात ठेवीदारांनी याचिका दाखल केल्यानंतर सहकार खात्यामार्फत लेखापरीक्षक गोगटे आणि कंपनी यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दाखल केली व त्यानंतर ह्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करूनसुद्धा आरोपी मोकाट आहेत; त्यामुळे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा अथवा विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून तपास करावा, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात ठेवीदार जयप्रकाश पतसंस्थेने दाखल केली आहे. शासनाने बँकेवर २००८ मध्येच अवसायकाची नेमणूक केली.

सुरुवातीला इन्शुरन्स कंपनीमार्फत लाखाच्या आतील ठेवी परत देण्यात आल्या; पण कुरुंदवाड येथील जयप्रकाश पतसंस्थेने सुमारे ३.५ कोटी रुपये, तर तत्कालीन रत्नदीप पतसंस्थेने (विलीनीकरणानंतर ए. बी. पाटील सर्वोदय पतसंस्था) ५ कोटी रुपयांची ठेव ठेवली होती, ती परत मिळाली नाही; त्यामुळे ह्या दोन संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेत अवसायकांना ह्या ठेवी परत मिळण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका दाखल करून केली. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या प्रभारी अधिकारी म्हणून आतापर्यंत तीन पोलीस निरीक्षक बदलले; पण तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर करूनसुद्धा संबंधित आरोपींना अटक केली नसल्याचे न्यायालयाच्या अ‍ॅड. सुतार यांनी निदर्शनास आणून दिले.यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाबँकेचे तत्कालीन अध्यक्ष संजय पाटील, विद्यमान कुरुंदवाड नगराध्यक्ष जयराम पाटील व नगरसेवक रामचंद्र डांगे व इतर १७ संचालकांविरोधात ४२० कलमाखाली २८ आॅगस्ट २०१८ ला फसवणुकीची व विश्वासघाताची फिर्याद दिली आहे; परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. 

 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस