एडस् जागृती मॅरेथॉनमध्ये रूतुल शिंदे,अंजली वायदंडे विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:44 PM2019-02-21T15:44:42+5:302019-02-21T15:46:29+5:30

कोल्हापूर जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगावचा धावपटू रूतुल शिंदे आणि बळवंत कॉलेज विट्याची अंजली वायदंडे यांनी विजेतपद पटकावले.

Rutul Shinde, Anjali Vaithande winners in AIDS Awareness Marathon | एडस् जागृती मॅरेथॉनमध्ये रूतुल शिंदे,अंजली वायदंडे विजेते

कोल्हापूर जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल,राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजेत्यांसमवेत दीपा शिपुरकर, डॉ. सुप्रिया देशमुख,डॉ. डी. आर मोरे,प्रा. डी.के. गायकवाड, प्रा. संग्राम मोरे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देएडस् जागृती मॅरेथॉनमध्ये रूतुल शिंदे,अंजली वायदंडे विजेतेजिल्हा एडस् नियंत्रण पथकामार्फत आयोजन

कोल्हापूर : जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगावचा धावपटू रूतुल शिंदे आणि बळवंत कॉलेज विट्याची अंजली वायदंडे यांनी विजेतपद पटकावले.

रस्सीखेच खेळाडु संदीप चौगले यांच्या हस्त मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आला. निखील जाधव (वसंतदादा पाटील तासगाव) आणि चैतन्य श्ािंदे (गोखले कॉलेज कोल्हापूर) या पुरूष गटात दुसरा व तिसरा तर महिला गटामध्ये प्रियांका पडवळ ,आंकाक्षा मोरे (दोघी राजाराम महाविद्यालय कोल्हापूर)यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर म्हणाल्या,युवकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अधिक दिसून येते. एडस्विषयक शास्त्रीय माहिती घेऊन ती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवली तर गैरसमज दूर होतील.

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, युवकांसोबतच महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही जनजागरण मोहिमेत पुढाकार घ्यावा. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर मोरे,प्रा. डी.के. गायकवाड, प्रा. संग्राम मोरे उपस्थित होते.

 

 

Web Title: Rutul Shinde, Anjali Vaithande winners in AIDS Awareness Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.