शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

kdcc bank : मंत्री हसन मुश्रीफच जिल्हा बँकेचे पुन्हा कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 2:04 PM

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कृषी पतपुरवठा क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद पुन्हा ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कृषी पतपुरवठा क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद पुन्हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच गळ्यात पडले. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांना संधी देण्यात आली. दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. विरोधी शिवसेनेने अध्यक्ष निवडीबाबत पडद्यामागून हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांची डरकाळी फुटलीच नाही.जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक गुरुवारी दुपारी तीन वाजता बँकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे होते. बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १८ जागा जिंकत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता कायम राखली.शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या. बँकेच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची केलेली मागणी आणि मंत्री मुश्रीफ यांनी अध्यक्ष पदाची पुन्हा जबाबदारी स्वीकारण्यास दिलेल्या नकारामुळे अध्यक्ष कोण होणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती. गुरुवारी सकाळी सत्तारुढ आघाडीच्या १८ संचालकांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये एकमुखाने अध्यक्ष पदासाठी मुश्रीफ यांचे तर उपाध्यक्ष पदासाठी राजू आवळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. निवड सभेमध्ये दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या. अध्यक्ष पदासाठी मुश्रीफ यांचे नाव आमदार विनय काेरे यांनी सुचविले. त्यास आमदार पी. एन. पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी आवळे यांचे नाव आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सुचविले. त्यास विजयसिंह माने यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रशासकीय कालावधी संपुष्टात येताना बँकेचा १०३ कोटी संचित तोटा होता. गेल्या सहा वर्षांत हा तोटा कमी करून बँक १५० कोटींच्या नफ्यात आणली. सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्यामुळे बँकेला पूर्वपदावर आणता आले असून, आगामी काळात बँक देशात नंबर वन करण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय काेरे, आमदार पी. एन. पाटील, निवेदिता माने यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष राजू आवळे यांनी आभार मानले.

मुश्रीफ तिसऱ्यांदा अध्यक्ष

हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले. मुश्रीफ हे बँकेचे ४३ वे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले, तर राजू आवळे यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड झाली.

अध्यक्ष नाव - कारकिर्द

एस. जी. दाभोळकर - १९३८ ते १९४४ व १९४५ ते १९४९

भास्करराव जाधव - १९४४ ते १९४५

डॉ. पी. सी. पाटील - १९४९ ते १९/४/१९५०

व्ही. जी. सरनाईक - १९५० ते १९५६

व्ही. जी. चव्हाण -१९५८ ते १९६१

व्ही. के. चव्हाण-पाटील - १९६१ ते १९६७

बी. एस. पाटील - १९६७ ते १९६९

जी. एस. भोगावकर - १९६९ ते १९७०

उदयसिंगराव गायकवाड - १९७० ते १९७१

जी. एस. भोगावकर - मार्च  १९७१ ते डिसेंबर १९७१

श्रीपतराव बोंद्रे - डिसेंबर  १९७१ ते मार्च १९७३

डी. डी. निंबाळकर - मार्च १९७३ ते डिसेंबर १९७३

नरसिंगराव पाटील - डिसेंबर  १९७३ ते मार्च १९७५

हिंदुराव पाटील - मार्च  १९७५ ते मार्च १९७६

शामराव भिवाजी पाटील - मार्च  १९७६ ते मार्च १९७७

वाय. डी. पाटील - मार्च  १९७७ ते मार्च १९७८

डी. टी. पाटील - मार्च १९७८ ते फेब्रुवारी १९७९

पी. बी. पाटील - फेब्रुवारी १९७९ ते जुलै १९८०

दिनकरराव मुद्राळे - जुलै १९८० ते मार्च १९८१

बाळासाहेब पाटील-कौलवकर - मार्च १९८१ ते मार्च १९८२

डॉ. आर. एस. संकपाळ - मार्च १९८२ ते मार्च १९८३

अण्णासाहेब चौगुले - मार्च १९८३ ते मार्च १९८४

पी. बी. पाटील - मार्च १९८४ ते फेब्रुवारी १९८६

कृष्णराव किरूळकर - फेब्रुवारी १९८६ ते मार्च १९८७

राजाराम देसाई - मार्च १९८७ ते मार्च १९८८

पी. बी. पाटील - मार्च १९८८ ते एप्रिल १९९१

पी. एन. पाटील - एप्रिल १९९१ ते डिसेंबर १९९५

अब्दुलगणी फरास - डिसेंबर १९९५ ते नोव्हेंबर १९९६

हसन मुश्रीफ - नोव्हेंबर १९९६ ते नोव्हेंबर १९९९

सदाशिवराव मंडलिक - नोव्हेंबर १९९९ ते डिसेंबर २०००

वसंतराव मोहिते - डिसेंबर २००० ते एप्रिल २००१

सदाशिवराव मंडलिक - एप्रिल २००१ ते डिसेंबर २००१

के. पी. पाटील - डिसेंबर २००१ ते डिसेंबर २००३

व्ही. बी. पाटील - डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००४

ए. वाय. पाटील - डिसेंबर २००४ ते जून २००६

निवेदिता माने - जून २००६ ते डिसेंबर २००६

टी. आर. पाटील - डिसेंबर २००६ ते नोव्हेंबर २००७

विठ्ठलराव नाईक-निंबाळकर - नोव्हेंबर २००७ ते नोव्हेंबर २००८

पी. जी. शिंदे - नाेव्हेंबर २००८ ते नोव्हेंबर २००९

धनंजय डोईफाेडे - नाेव्हेंबर २००९ ते जून २०१०

उत्तम इंदलकर - जून २०१० ते एप्रिल २०१२

प्रतापसिंह चव्हाण - एप्रिल २०१२ ते मे २०१५

हसन मुश्रीफ - मे २०१५ ते जानेवारी २०२२

हसन मुश्रीफ - जानेवारी २०२२ पासून.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ