कोल्हापूर : रस्त्यात दुचाकीवर केक कापून त्याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करत दहशत माजवणारा इचलकरंजीतील जर्मनी गँगचा गुंड रुपेश पंडित नरवडे (वय ३०) याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चांगलाच समाचार घेतला.ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोलिसांचे पाय पकडले. यापुढे रस्त्यात वाढदिवस साजरा करणार नाही आणि दहशतीचे व्हिडीओ सोशल मीडियात टाकणार नाही, अशी ग्वाही त्याने पोलिसांना दिली. माफीनाम्याचा व्हिडीओ त्याने स्वत: च्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी गँगमधील गुंड रुपेश नरवडे याने दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीत रस्त्यावर वाढदिवस साजरा केला. दुचाकीच्या सिटवर केक कापला. फटाक्यांची आतषबाजी केली. मित्रांसोबत जल्लोष केल्याचे व्हिडीओ इन्स्टावरून व्हायरल करून दहशत माजवली.हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी कोल्हापुरात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चूक कबूल करून असा प्रकार पुन्हा करणार नसल्याचे सांगितले.
Kolhapur: इन्स्टाग्रामवर दहशतीची रील्स व्हायरल केली; जर्मनी गँगच्या गुंडाची पोलिसांनी जिरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:24 IST