शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

'लक्ष्मी'पाठोपाठ कौटुंबिक कलहाची 'अवदसा'; नागपूर-रत्नागिरीचे २२४ कोटी न्यायालयात पडून 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 26, 2025 16:47 IST

सुनावणीद्वारे ३१ कोटींचे वाटप

इंदुमती गणेशकोल्हापूर : लक्ष्मीपाठोपाठ अवदसा येते ही म्हण नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनातून पुन्हा अनुभवायला येत आहे. नुकसानभरपाईची घसघशीत रक्कम मलाच मिळाली पाहिजे या भावनेतून दोन भाऊ, भाऊ-बहीण, मामा-भाचे अशा भाऊबंदकीच्या वादामुळे मागील अडीच वर्षात २५५ कोटी ७० लाख ७५ हजार ५३४ रुपये न्यायालयात जमा झाले आहेत. त्यापैकी फक्त ३३ कोटी १३ लाख ३० हजार १३४ इतक्या रकमेचे सुनावणीद्वारे वाटप झाले आहे. अजूनही २२४ कोटी रुपये वाटपाविना पडून आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर हक्काच्या रकमेसाठी पिढ्यान्पिढ्या न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या लागतील असे चित्र आहे.

जमीन, शेत, घर, रोख रकमा अशा कोणत्याही प्रकारची संपत्ती जास्त असली की त्यातून होणाऱ्या वादांनी नातेसंबंध दुरावतात. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनातील नुकसानभरपाईच्या डोळे मोठे करायला लावणाऱ्या आकड्यांनी नात्यांमधील हा फोलपणा पुन्हा अधोरेखित केला आहे. इतकी वर्षे गुण्यागोविंदाने राहत असलेले आई-वडील, भाऊ-बहिणी, मामा-भाचे. भाऊबंद एकमेकांचे वैरी झाले.सातबारा एकत्र असेल तर इतर खातेदार सहमती देत नाहीत. नुकसानीची सगळी रक्कम मलाच मिळाली पाहिजे, या हव्यासातून नात्यांचा गुंता इतका वाढला की प्रशासनालाही कुणाच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी याचे कोडे पडले, शेवटी त्यांनी सन २०२३ पासून वादातील तब्बल २५५ कोटी रुपये न्यायालयात जमा केले. त्यापैकी न्यायालयाने सुनावणीद्वारे ३१ कोटींचे वाटप केले आहे.

तालुका : गावांची संख्या : खातेदार संख्या : न्यायालयात जमा रक्कम : न्यायालयाने वाटलेली रक्कमकरवीर : ८ : २७ : ८५ कोटी ३७ लाख ८३ हजार ६९० : १२ कोटी ४४ लाख ८१ हजार ४५६हातकणंगले : ६ : ३३ : २३ कोटी ५९ लाख ४० हजार ३८५ : १ कोटी ३९ लाख ४७ हजार २७२शाहूवाडी : २८ : ९१ : १०० कोटी, ६४ लाख ९८ हजार ५६६ : १६ कोटी, ४१ लाख १९ हजार ३२०पन्हाळा : ७ : १६ : ४६ कोटी ८ लाख ५२ हजार ८९३ : ८७ लाख ८२ हजार ८३

व्याजासहीत रक्कम परतन्यायालयाने ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये डिपॉझिट केली आहे. पक्षकारांना नोटीस काढून सुनावणी घेतली जाते. निकाल लागताच खातेदाराला मूळ रक्कम व्याजासहीत दिली जाते. मात्र अनेकजण सुनावणीलाच हजर राहत नसल्याने न्यायालयीन निकालावरदेखील मर्यादा येतात.

ज्यांनी अजून नुकसानभरपाई घेतलेली नाही त्या खातेदारांनी तात्काळ दावा करून आपली रक्कम घ्यावी. अन्यथा ती न्यायालयात जमा करावी लागेल. आपल्यातील वाद सामंजस्याने मिटवले तर पुढे न्यायालयीन प्रक्रिया टाळता येते. - अर्चना नष्टे, भूसंपादन अधिकारी