राज्यातील स्वयंपाक्यांचे ११३ कोटी मानधन अखेर जमा, तीन महिन्यांचे एकदम मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:11 IST2025-01-29T13:10:36+5:302025-01-29T13:11:14+5:30

दीड लाख मदतनीसांना दिलासा

Rs 113 crore honorarium for cooks in the state finally deposited, three months worth will be given immediately | राज्यातील स्वयंपाक्यांचे ११३ कोटी मानधन अखेर जमा, तीन महिन्यांचे एकदम मिळणार 

संग्रहित छाया

राजाराम लोंढे

कोल्हापूर : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ अखेरचे प्रलंबित मानधन आता मिळणार आहे. संबंधितांच्या खात्यावर ११३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील १ लाख ५२ हजार ४६४ मदतनीसांना दिलासा मिळाला आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र सरकारची असून, ती राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वयंपाक्यांवर असते. त्यांना केंद्र सरकारकडून दरमहा सहाशे रुपये, तर राज्य सरकारकडून १९०० असे प्रतिमहिना २५०० रुपये मानधन मिळते. वर्षातून दहा महिन्यांचे मानधन त्यांना दिले जाते. मात्र, स्वयंपाक्यांना ऑक्टोबरपासून मानधन मिळालेले नव्हते.

असे आले पैसे

  • केंद्र सरकारकडून - ९ कोटी १४ लाख ७८ हजार ४०० रुपये
  • राज्य सरकारकडून - २८ कोटी ९६ लाख ८१ हजार ६०० रुपये


शिक्षणाधिकाऱ्यांना हे राहणार बंधनकारक
ज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली, त्याच कारणासाठी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.
अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा.
अनुदान अदा करताना शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करावे.
स्वयंपाक्यांसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींची पूर्तता केल्याची खात्री करावी.

जिल्हानिहाय मदतनीस संख्या 
जिल्हा  - मदतनीस

अहिल्यानगर - ८७६५
अकोला - २८७६
अमरावती - ३७८५
छत्रपती संभाजीनगर - ५७३१
भंडारा - २१४२
बीड -  ५३२०
बुलढाणा - ४२९५
चंद्रपूर - ३५७३
धुळे - ३१२०
गडचिरोली - २७२०
गोंदिया - २४३७
हिंगोली - २१४०
जळगाव - ६०६०
जालना - ४००१
कोल्हापूर - ६०९०
लातूर  - ४१११
मुंबई  - १०२०
नागपूर - ४२२७
नांदेड - ५६५७
नंदुरबार - ३३९४
नाशिक - ८५०२
धाराशिव - ३०४६
पालघर - ४६४०
परभणी  - ३४५३
पुणे  - ८६५३
रायगड - ४७०१
रत्नागिरी - ३९५८
सांगली - ४४८८
सातारा - ५८००
सिंधुदुर्ग - २१६१
सोलापूर - ७७५३
ठाणे  - ३८९२
वर्धा  - २००७
वाशिम - २१९६
यवतमाळ - ५८३०

Web Title: Rs 113 crore honorarium for cooks in the state finally deposited, three months worth will be given immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.