कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 15:39 IST2019-12-26T15:32:44+5:302019-12-26T15:39:19+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतशिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे.
राज्यात महाआघाडीचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर राखला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेऊ असे यावेळी दुधवडकर यांनी सांगितले, मात्र याच वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोकळ्या पद्धतीने पाठिंबा न देता शिवसेनेला ही पदे मिळाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका चंद्रदीप नरके यांनी मांडली आहे.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सत्याजित पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.