शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय; हसन मुश्रीफांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:26 IST

कोल्हापुरात उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची सभा होणार आहे. या सभेअगोदरच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

कोल्हापूर- कोल्हापुरात उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची सभा होणार आहे. या सभेअगोदरच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याने या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जागा मागितल्या असल्याचा गंभीर आरोप  रोहित पवार यांनी मुश्रीफ यांच्यावर केला. यावर आता मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. 

मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास: रोहित पवार

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एमआयडीसीत नोकऱ्या भूमीपुत्रांनाच द्यायला हव्यात या मागण्या योग्य आहेत. भूमीपुत्रांच्या जमीनी त्या उद्योगासाठी गेल्या आहेत. आरोप करण्यासाठी जागा नाही त्यामुळे ते आमच्यावर काहीही आरोप करत आहेत. शरद पवारांना अशा छोट्या मैदानात आणायला नको होते. पवार साहेबांची सभा तपोवन मैदान अशा ठिकाणी हवी होती, असंही मुश्रीफ म्हणाले. 

"रोहित पवार अजुनही छोटे आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे,  त्यांनी कुटुंबातील वाद मिटवायला हवेत. वाढवायला नको होते, असंही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.  

'मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास'

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याने या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जागा मागितल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची आज शुक्रवारी कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आ.पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसींमधील उद्योजकांना मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक त्रास देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे अनेक दिवसांपासून येत आहेत. पक्ष एकसंघ असताना आम्ही जिल्ह्यातील संबंधित नेत्याशी याबाबत बोललोही होतो. पण, त्यांनी वेगळीच कारणे सांगितली. उद्योजकांना त्रास दिला जात असल्याने ते कोल्हापुरात उद्योगाचा विस्तार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परजिल्ह्यात विस्तारीकरणासाठी हे उद्योजक जागा मागत आहेत. नेत्यांचे कार्यकर्तेच जर असा त्रास देत असतील तर या जिल्ह्यात उद्योग, रोजगार कसा निर्माण होईल.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार