रोहिदास पाटील यांची प्रकृती स्थिर, कोल्हापुरात उपचार सुरु, दहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली

By पोपट केशव पवार | Updated: February 10, 2024 17:36 IST2024-02-10T17:36:10+5:302024-02-10T17:36:51+5:30

मुलीला भेटण्यासाठी कोल्हापूरात आले असताना प्रकृती झाली अस्वस्थ

Rohidas Patil's condition is stable, treatment started in Kolhapur, his condition worsened ten days ago | रोहिदास पाटील यांची प्रकृती स्थिर, कोल्हापुरात उपचार सुरु, दहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली

रोहिदास पाटील यांची प्रकृती स्थिर, कोल्हापुरात उपचार सुरु, दहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली

पोपट पवार, कोल्हापूर: माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील (दाजी) यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचे पुत्र धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी शनिवारी दिली.

रोहिदास पाटील दहा दिवसांपूर्वी आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोल्हापूर येथे आले होते. यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ४ फेब्रुवारीला त्यांचे जावई डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याच कोल्हापुरातील साई कार्डियाक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याने प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, फुफ्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोल्हापुरला न येता घरीच्या त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यांच्या तब्येतीविषयी वेळोवेळी अपडेट दिली जाईल, असे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rohidas Patil's condition is stable, treatment started in Kolhapur, his condition worsened ten days ago