शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बुद्धिबळ : पुण्याचा रोहन जोशी ठरला विजेता, अनुज दांडेकर उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:53 PM

कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देबुद्धिबळ : पुण्याचा रोहन जोशी ठरला विजेता, अनुज दांडेकर उपविजेता अशोक कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या पाटील तिसऱ्या स्थानी

कोल्हापूर : कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले.

पुण्याचा अनुज दांडेकर आणि जयसिंगपूरची दिव्या पाटील या दोघांचे समान साडेसात गुण झाल्यामुळे सरस टायब्रेक गुण आधारे अनुजला उपविजेतेपद मिळाले. दिव्याला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. तिघांना अनुक्रमे सहा, पाच व चार हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.येथील श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण मराठे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आनंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर, सागर गुळवणी, दीपक वायचळ, बी. एस. नाईक, अनिल हिवरेकर, विद्यानंद देवधर, स्वाती कुलकर्णी, वैदेही बोरकर, अभिजित कुलकर्णी उपस्थित होते. नागनाथ हलकुडे परिवार, योगेश महामुनी, अनुराधा गुळवणी, जयश्री पाटील, शाहरुख कुरणे, अनिकेत कुलकर्णी, धनंजय इनामदार, अजित कुलकर्णी यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

गटनिहाय विजेते

  • खुला गट - श्रीराज भोसले, प्रणव पाटील, रवींद्र निकम, राहुल सामानगडकर, मुदस्सर पटेल, संतोष कांबळे, अथर्व भांबुरे, सारंग पाटील, सौरभ छत्रे, निहाल मुल्ला, अनिष गांधी, सदानंद बाचलकर, श्रीधर तावडे, निहाल महात.
  • ६० वर्षांवरील गट- बी. एस. नाईक, भारत पाटोळे, अविनाश चपळगावकर, सूरज पाटील. महिला गट- जिया महात, श्रावणी हलकुडे, श्रावणी बोरकर, समृद्धी कुलकर्णी, सृष्टी कुलकर्णी, श्रावणी खाडे-पाटील, अरिना मोदी, अवनी कुलकर्णी.
  • १५ वर्षांखालील गट- आयुष महाजन, रोहित बोडके, सुमित लिमये, आर्यन हलकुडे, प्रणव गुणके, अर्जुन चौगुले, कनिष्क शिर्के, सार्थक घोरपडे.
  • १३ वर्षांखालील गट- हदिन महात, हर्ष शेट्टी, विश्वनिल पाटील, नील मंत्री, तनिष्क देसाई, हर्ष वेदांत, आदित्य कोळी, अनिश असनारे.
  • ११ वर्षांखालील गट- दिशा पाटील, प्रज्वल वरुडकर, पार्थ शेलार, सोहम जगनाडे, राजेश कुलकर्णी, व्यंकटेश खाडे-पाटील, संकेत चौगुले, आर्यन पाटील.
  • नऊ वर्षांखालील गट- अथर्व तावरे, राजदीप पाटील, अभय भोसले, आदित्य चव्हाण, आर्यन मंत्री, आयुष हतगिणे, तनिष्क कवडे, इंद्रनील पाटील.
  • ७ वर्षांखालील गट- आशिष मोटे, आरव पाटील, वेदिका यमगर, अर्णव पाटील, प्रेम निचळ, वीर कारंडे, श्लोक आंबेकर, अनुजा कोळी.

 

 

टॅग्स :Chessबुद्धीबळkolhapurकोल्हापूर