कळे येथे सराफ पेढीवर दरोडा; 40 लाखांचे सोनं केलं लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 09:45 IST2019-11-04T09:44:39+5:302019-11-04T09:45:15+5:30

या बँकेपासून अवघ्या पन्नास फुटाच्या अंतरावर ही सराफी पेढी आहे यापूर्वीही दोन वेळा हीच सराफी पेढी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता

Robbery on Jewelry shop in Kolhapur | कळे येथे सराफ पेढीवर दरोडा; 40 लाखांचे सोनं केलं लंपास

कळे येथे सराफ पेढीवर दरोडा; 40 लाखांचे सोनं केलं लंपास

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रियंका ज्वेलर्स हि सराफी पेढी चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीच्या दागिने सह मोठी रोकड लंपास केले आहे सोमवारी पहाटे ही घटना घडली.  

गतवर्षी कळे येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील यशवंत सहकारी बँक कडून चोरट्यांनी 35 ते 40 लाखांपेक्षा अधिक सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते या बँकेपासून अवघ्या पन्नास फुटाच्या अंतरावर ही सराफी पेढी आहे यापूर्वीही दोन वेळा हीच सराफी पेढी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता चोरट्यांनी किमान दहा ते पंधरा लाखाचा ऐवज लंपास केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे सराफी पेढी फुल याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे दुकानासमोर नागरिकांची ही मोठी गर्दी झाली आहे.

Web Title: Robbery on Jewelry shop in Kolhapur

टॅग्स :Policeपोलिस