शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

घरगुती सेप्टिक टाकीतील मैला उपसातही दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 4:42 PM

कोल्हापूर शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्यांची कमाई ठरलेली आहे.

ठळक मुद्दे खासगी ठेकेदार, आरोग्य विभागातील कर्मचारी यांची मिलीभगत महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारालाच काम देण्यासाठी धडपड

विनोद सावंतकोल्हापूर : शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्यांची कमाई ठरलेली आहे.शहरासह उपनगरात बहुतांशी परिसरात ड्रेनेज लाईन झालेली नाही. अमृत योजनेतून लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३० ते ४० टक्के परिसरात घरगुती मैला सेप्टिक टाकी बसवल्या आहेत. दोन ते तीन वर्षातून टाकी भरल्यानंतर उपसा करावा लागतो.

महापालिकेत पैसे भरल्यानंतर मैला सक्शन टँकर उपसा करण्यासाठी पाठविला जातो. पाचशे रुपयेमध्ये टाकी उपसा करून मिळते. संकलित केलेला मैला सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे प्रक्रियासाठी दिला जातो. उपसा टँकरला मागणी वाढल्यामुळे नागरिकांना त्वरित सुविधा मिळण्यासाठी मैला उपसा करणाऱ्या काही खासगी कंपनीचे टँकर यांच्याशी महापालिकेने करार केला आहे. मात्र, महापालिकेच्या टँकरला प्राधान्य द्यायचे ठरले आहे.असे असताना वरकमाईसाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी खासगी कंपनीला टाकी उपसा करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. नागरिकांनी कर्मचाऱ्यांकडे टाकी उपसा करण्याचे म्हटल्यानंतर वास्तविक त्यांनी महापालिकेच्या टँकरला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्याकडून असे होत नाही. खासगी टँकरचालकाला नागरिकांशी संपर्क करण्यास सांगितला जाते.महापालिका तोट्यात, खासगी टँकरवाल्यांची चांदीखासगी टँकर ठेकेदार आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या मिलीभगतमुळे मैला उपसा करण्यासाठी महापालिकेकडे मागणी कमी होऊ लागली आहे. सध्या केवळ सरकारी शौचालय येथील मैला काढण्याचे काम महापालिकेचे मैला टँकर करत आहेत. यामुळे खासगी मैला उपसा करणाऱ्यांची चांदी होत आहे.नागरिकांची आर्थिक फसवणूकमैला उपसा करण्यासाठी एका फेरीला खासगी टँकरचालक सातशे ते हजार रुपये घेतात. वास्तविक एका फेरीतून काम होत असताना जादा मैला असल्याचे खोटे सांगून दोन फेऱ्या करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. जे काम महापालिका पाचशे रुपयात करून देते, त्यासाठी नागरिकांना नाईलाजास्तव दोन हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.चौकटजेव्हा कुंपणच शेत खातेवास्तविक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे हित जोपासणे गरजेचे आहे. मात्र, ते महापालिकेचा मैला उपसा टँकर पंक्चर झाला आहे, नादुरुस्त आहे, दुसरीकडे गेला आहे. त्यामुळे चार दिवस थांबावे लागेल, अशी कारणे सांगून खासगी टँकर नागरिकांच्या गळ्यात मारत आहेत. मैला तुंबल्यामुळे अडचणीत असणारे नागरिक त्यांच्या सांगण्याला बळी पडत आहेत. 

  • महापालिकेची मैला उपशासाठी प्रति खेप फी  ५०० रुपये
  • शहराबाहेरील उपशासाठी फी  ३०००
  • शहरासाठी खासगी टँकरची फी  ७००
  • शहराबाहेर खासगी टँकर फी  ३५००
  • महापालिकेकडे मैला सक्शन टँकर  ५
  • महापालिका नियुक्त खासगी ठेकेदार  ५
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर