पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून रस्त्याचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:56+5:302020-12-24T04:21:56+5:30
पंचतारांकित औद्योगिक वसाहत असे नाव धारण करणाऱ्या या वसाहतीतून जाणाऱ्या चारपदरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता अत्यंत खराब ...

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून रस्त्याचे काम युद्धपातळीवर
पंचतारांकित औद्योगिक वसाहत असे नाव धारण करणाऱ्या या वसाहतीतून जाणाऱ्या चारपदरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता अत्यंत खराब झाला झाला होता. एखाद्या पाणंद रस्त्याची अवकळा या चारपदरी रस्त्याला प्राप्त झाली होती. या रस्त्याचे नव्याने बांधकाम व्हावे यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मॅक) यांनी सातत्याने आंदोलने व पाठपुरावा केल्याने २०१८ मध्ये हा रस्ता औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे २७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून या रस्त्याचे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षात काम सुरू झालेले आहे. औद्योगिक वसाहतीचे कार्यकारी अभियंता एस. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक अभियंता एस. व्ही. आपराज यांच्या देखरेखीखाली पुण्याच्या आर एम के इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून अगदी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम सुरू आहे. जवाहर साखर कारखाना, सिल्व्हर झोन वसाहतीतून राष्ट्रीय महामार्ग (लक्ष्मी टेकडी) अशा सुमारे १० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे.