शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:41 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाईकोल्हापूर उत्तरचे राजकारण : छत्रपती घराण्याशी पुन्हा संपर्क साधणार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.चांगला उमेदवार दिल्यास या मतदारसंघातून काँग्रेसला चांगली संधी आहे; परंतु उमेदवार ठरवितानाच पक्षाची दमछाक होऊ लागली आहे. एका बाजूला लढण्यासाठी सोडाच, पक्षाची उमेदवारी घेण्यासाठीही कोण उमेदवार मिळेनात, अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी पाच लोकांचे अर्ज आले आहेत.

पुणे ग्रामीणपासून ते सोलापूर, सातारा जिल्ह्यांतही पक्षाकडे अर्ज न्यायलाही कोण फिरकलेले नाहीत. असे असतानाही एकाच घरात दोन उमेदवार कशाला, असा मुद्दा पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीतून पुढे आणला जात आहे. हा मुद्दा कोल्हापुरात जसा पुढे आला आहे, तसाच तो लातूरमध्येही आणला जात आहे. ऋतुराज पाटील यांनी लढायची तयारी केली आहे.

गेल्या दोन वर्षांतील त्यांचा प्रत्येक सार्वजनिक कार्यातील वावर व परवाच्या महापुरातील सहभाग पाहता, ते रिंगणात उतरतील, असा अनेकांचा होरा आहे. त्यांच्याशिवाय मधुरिमा राजे यांचेही नाव कायमच सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे; परंतु शाहू महाराज यांच्याकडून त्यास अजून संमती मिळालेली नाही; यासाठी दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या अनुषंगाने शाहू महाराज यांच्याशीच थेट बोलून विनंती करावी, अशा हालचाली सुरू आहेत. कदाचित आज, शनिवारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.गेले १५ वर्षे विविध सामाजिक कामांत सक्रीय असलेले दौलत देसाई यांनीही या वेळेला पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे काका माजी आमदार दिवंगत दिलीप देसाई हे याच मतदारसंघातून शिवसेनेकडून १९९० ला निवडून आले होते; त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ नवीन नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोखले कॉलेजच्या माध्यमातून घरोघरी आपला संपर्क असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चांगली लढत देऊ, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.काही झाले तरी लढणारच : सत्यजित कदमगेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून मोदी लाटेतही दोन नंबरची मते घेतलेले सत्यजित कदम यांनीही काही झाले तरी निवडणूक लढविणारच अशी घोषणा केली आहे. महापालिकेतील ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, आदी भागांतून ८ नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महापालिकेत ते ताराराणी आघाडीचे नेते आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक हे जरी भाजपमध्ये गेले, तरी या आघाडीचे अस्तित्व कायम ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे या आघाडीकडूनही ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली, तर ते या मतदारसंघातून भाजपकडूनही प्रयत्न करू शकतात. सत्यजित कदम यांचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी हाडवैर आहे. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील गटाशीही त्यांचा राजकीय संघर्ष आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची ताकद त्यांच्यामागे असेल. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर