शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

पोलिसांचा थंडावला दंडा, भाईगिरीचा नवा फंडा; ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:17 IST

शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी

तानाजी पोवार

कोल्हापूर : विना कष्ट अमाप पैसा मिळविण्यासाठी कुणाचा तरी ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन् बाहेर येऊन गळ्यात पिवळ्या धमक साखळ्या अडकून भाईगिरी गाजवायची. मग पुढे खंडणी, फाळकूटदादा, वाटमारी, कुळे काढणे, मटक्यांचे अड्डे, पत्त्यांचे क्लब चालविण्याचे त्यांना जणू लायसन्सच मिळते.बेकायदेशीर धंद्यातून बक्कळ पैसा मिळवायचा. त्यातूनच भागावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धी गॅंगशी दोन हात करायचे. ओठावर मिसरुड फुटण्यापूर्वीच कोवळी पोरं हातात नंग्या तलवारी घेऊन गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करू लागली आहेत.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ‘मोक्का’ कारवाईत मोठ्या संख्येने गुंडांना कारागृहात बसावे लागले; पण त्यामुळे दुसऱ्या स्थानावरील गुंडांचे फावले असून ते आज या टोळींच्या प्रमुखांच्या जागा घेण्यासाठी मोठमोठे गुन्हे करताना दिसत आहेत.शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी होतात. या गुंडांकडून राजरोसपणे नंग्या तलवारी घेऊन भागात दहशत माजवली जात आहे. किरकोळ वाद झाला तरीही तलवारी, कुकरी, एडका, गुप्ती, आदी प्राणघातक हत्यारे सपासप बाहेर पडतात. या गुंडांना खरंच पोलिसांचे भय नाही का? असा प्रश्न समाजासमोर उभारला आहे.वारे वसाहत, सुधाकर जोशी नगर, राजेंद्रनगरात होणारे प्रकार हे त्याचाच एक भाग आहे. शनिवारी वारे वसाहतीतील घडलेला प्रकार हा सर्वसामान्यांच्या अंगावर थरकाप उडविणारा आहे. कोल्हापुरात सध्या जुना राजवाडासह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीसह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळ्यांचे प्रस्त वाढतच चालले आहे.

बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू

- ‘बेकायदेशीर व्यवसाय बंद आहेत’ असे मोठ्या दिमाखात सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सध्या मटका, जुगार क्लब, दारू तस्करी, गावठी हातभट्ट्या, आदी राजरोसपणे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत.- या गुंडांकडूनच हे व्यवसाय चालविले जात आहेत. पोलीस ठाण्यातील डीबी पथकांशी त्यांचे असणारे लागेबांधे यामुळे सर्वसामान्य माणूस तक्रारीसाठी पुढे येत नाही.

कारागृहातून सुटताच जंगी मिरवणुका

गुन्हे करायचे, कारागृहात काही दिवस बसायचे. जामीन झाला की वाजत-गाजत मिरवणूक काढायची. गुंडगिरीचे वजन वाढविण्यासाठी अलीकडे ही क्रेझच झाली आहे. त्यातूनच गुन्हेगारी फोफावू लागली आहे.

वारे वसाहतीत झाला जंगी वाढदिवस

- वारे वसाहतीतील राड्यापूर्वी दोन दिवस अगोदरच तेथेच एकाचा जंगी वाढदिवस झाला.- हजारभर जणांनी तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारला. तेथेच खरी वादाची ठिणगी पडली.- पोलिसांना हे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला. त्याचेच पडसाद हाणामारीवर उमटले; पण दोन्हीही गटांकडे मारामारीचे खरे कारण समोर आणण्याचे धैर्यच नव्हते.

- पाच वर्षात ‘मोक्का’ कारवाई : ४८ टोळ्या, ३०२ गुंड अटक

- २०२१ मध्ये कारवाई : जुगार - १०१०, दारूबंदी -२६०३

- गर्दी, मारामारीच्या घटना : ३९१ गुन्हे

- बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर कारवाई : १३ गुन्हे (११ रिव्हॉल्व्हर, ६ रायफल)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस