शिंगणापूर बंधाऱ्यात रिक्षासह चालकाला जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 18:10 IST2020-05-16T18:07:57+5:302020-05-16T18:10:07+5:30
करवीर तालुक्यातील चिखली गावाहून शिंगणापूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये रिक्षा उलटली. अपघातात रिक्षासह चालकाला जलसमाधी मिळाली.

शिंगणापूर बंधाऱ्यात रिक्षासह चालकाला जलसमाधी
ठळक मुद्देशिंगणापूर बंधाऱ्यात रिक्षासह चालकाला जलसमाधीम्रुतदेह सापडला, रिक्षाचा शोध सुरू
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील चिखली गावाहून शिंगणापूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये रिक्षा उलटली. अपघातात रिक्षासह चालकाला जलसमाधी मिळाली.
अपघातामध्ये चालक रणजीत विरूपाक्ष स्वामी (वय ५० ,रा. लक्षतीर्थ वसाहत, शिवनेरी गल्ली) याना जलसमाधी मिळाली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तातडीने शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये शोध मोहिम राबविली. दुपारी रिक्षाचालकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. सायंकाळपर्यंत रिक्षाचा शोध सुरू होता. पण रिक्षा सापडली नाही.