शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, चंद्रकांत पाटील यांची मागणी : न दिल्यास राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे, संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाही तर मग भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. विधानसभेवेळी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याने त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते, असेही पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांनी दिलेला कबुलीनामा, अशा प्रकारची कॅबिनेट मंत्र्यांच्या बाबतची घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. संबंधित महिलेने अत्याचाराबाबत केलेल्या आरोपाची पोलीस शहानिशा करतील, त्यातून काय निष्पन्न व्हायचे ते होईल. आरोप चुकीचे असतील तर त्या महिलेवर कारवाई होईल. मात्र, तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी त्यांचे पंधरा वर्षे असलेले संबंध, त्यातून दोन मुले झाल्याची कबुली मुंडे यांनी दिली. हे सर्व नैतिकता आणि कायदा या दोन्हींच्या चौकटीत बसत नाही.

पवार यांचे राजकारण शुद्ध

राष्ट्रवादीने मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का, त्यांना उठाबशा काढायला लावायच्या हा त्यांचा प्रश्न आहे; पण शरद पवार यांनी ५० वर्षांत एकाला बाजूला करून दुसऱ्याला घेतले, हा राजकारणाचा भाग सोडला तर शुद्ध राजकारण केले. त्यामुळे ते निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.

जयंतराव, जनता तुम्हाला माफ करणार नाही

मुंडे यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याने राजीनाम्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केलेल्या गुन्ह्याची स्वत: कबुली दिल्यानंतर चौकशी कसली करता..? मित्र म्हणून माफी देणार असाल तर ठीक आहे. मात्र, जनता तुम्हाला माफ करणार नाही.