शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबावर साकारणार भक्तनिवास, अन्नछत्र, कम्युनिटी हॉल; १७० कोटींचा आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:56 IST

भाविकांच्या सुविधांना देणार प्राधान्य : दोन महिन्यांत कामे सुरू : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने दिली मंजुरी

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील सुधारित आराखड्याला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या सुधारित आराखड्यासाठीचा सर्व १७० कोटींचा निधी नियोजन विभागाकडून मिळणार असून, त्यात भाविकांना केंद्रस्थानी ठेवून भक्त निवास, अन्नछत्र, पालखी मार्गाचे रुंदीकरण, सोलर व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या सुधारणांचा समावेश आहे. दोन महिन्यांमध्ये आराखड्याची प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामाला सुरुवात होईल.पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या २५० कोटींच्या आराखड्याला मागील वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी मंदिर जतन संवर्धनाच्या कामासाठीच्या ८० कोटींचा निधी नियोजन विभागाकडून दिला गेला. ही कामे सध्या सुरू आहेत. त्यापुढील १७० कोटींची कामे त्या-त्या विभागांनी आपापल्या निधीतून करावी, असे सांगण्यात आले होते.मात्र, त्यात सुसुत्रता राहणार नसल्याने जिल्हा प्रशासनाने सगळा निधी नियाेजनकडून मिळावा, अशी मागणी केली होती. त्यावर नियोजन विभागाने भाविकांना केंद्रस्थानी ठेवून प्राधान्याने करायच्या कामांचा समावेश करून सुधारित आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महिन्याभरापूर्वी हा सुधारित आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील उपस्थित हाेते. जिल्हाधिकाऱ्यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

ही कामे होणार (रक्कम कोटीत)

  • गायमुख ते जोतिबा पायवाट रुंदीकरण : २०.२१
  • सेंट्रल प्लाझा दुरुस्ती, विस्तार : १६.३६
  • पार्किंग : १५.७०
  • सांडपाणी व्यवस्थापन : १५.०३
  • सोलर प्लांट उभारणी : ११.५०
  • भक्तनिवास, कम्युनिटी हॉल : १२.१३
  • प्राथमिक आरोग्य सेवा, अन्नछत्र : ०९.६५
  • दक्षिणद्वार ते जोतिबा मंदिर मुख्य प्रवेशद्वार रुंदीकरण : ०९.९०
  • आपत्ती व्यवस्थापन : ७.८६
  • हुजुरवाडा इमारतीत माहिती केंद्र : ३.६६
  • मुख्य पालखी मार्ग विस्तारीकरण : ८.२५
  • भाविकांसाठी सुविधा केंद्र : ९.८७
  • कुशिरे ते गायमुख पादचारी मार्ग व पार्किंग विकास : ९.७५
  • कायमस्वरूपी पाणीपुरवठा : १०.७४
  • घनकचरा व्यवस्थापन : ४.८८
  • बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण : ५.००
  • एकूण रक्कम : १७०.४९ कोटी

जोतिबा हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील कामे लवकर सुरू करून वेळेत पूर्ण करा. दोन महिन्यांत आराखड्याचे विस्तृत अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यासाठी प्राधान्य द्या. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Jyotiba Temple to get devotee facilities; ₹170 crore plan approved.

Web Summary : The Jyotiba temple development plan in Kolhapur gets ₹170 crore for devotee facilities. Includes accommodation, food services, road widening, and waste management. Work to begin in two months.