रस्ता रुंदीकरणासंदर्भात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:56+5:302020-12-05T04:56:56+5:30
इचलकरंजी : येथील जुना सांगली नाका या मुख्य मार्गावर रखडलेल्या रस्ता रुंदीकरणसंदर्भात गुरुवारी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात आढावा ...

रस्ता रुंदीकरणासंदर्भात आढावा बैठक
इचलकरंजी : येथील जुना सांगली नाका या मुख्य मार्गावर रखडलेल्या रस्ता रुंदीकरणसंदर्भात गुरुवारी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात आढावा बैठक झाली. त्यामध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना स्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भू-संपादनाचे काम कोल्हापूर भू-संपादन विशेष अधिकारी कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीस नगरसेवक इकबाल कलावंत, ध्रुवती दळवाई, दीपाली बेडक्याळे उपस्थित होते.